Harshit Rana | Shah Rukh Khan | KKR Sakal
IPL

KKR: 'तू टेन्शन घेऊ नको आपण...', BCCI ने बंदी घातल्यानंतर शाहरुखने काय केलेलं प्रॉमिस? हर्षित राणाचा खुलासा

Harshit Rana - Shah Rukh Khan: आयपीएल 2024 दरम्यान हर्षित राणावर बीसीसीआयने एका सामन्याची बंदी घातली होती, त्यावेळी शाहरुख खानने त्याला काय शब्द दिला होता, याबाबत त्याने आता खुलासा केला आहे.

Pranali Kodre

Harshit Rana - Shah Rukh Khan: इंडियन प्रीमियर लीग 2024 स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी चेन्नईमध्ये कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघात पार पडला. या सामन्यात कोलकाताने 8 विकेट्सने विजय मिळवत तिसऱ्यांदा आयपीए ट्रॉफी नावावर केली.

कोलकाता संघाने या विजयानंतर फ्लाईंग किस करत सेलीब्रेशन केले होते. यामागील कल्पना सहसंघमालक शाहरुख खानची होती. याबाबत कोलकाताचा वेगवान गोलंदाज हर्षित राणाने खुलासा केला आहे. हर्षितनेही कोलकाताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला आहे. त्याने 13 सामन्यांत 19 विकेट्स घेतल्या.

KKR

दरम्यान, हर्षितच्या या हंगामातील कामगिरीबरोबर तो काही वादग्रस्त गोष्टींमुळेही चर्चेत राहिला. हर्षितवर बीसीसीआयने सनरायझर्स हैदराबादविरुद्धच्या साखळी सामन्यात मयंक अग्रवालला आणि दिल्ली कॅपिटल्स विरूद्धच्या साखळी सामन्यात दिलेल्या सेंड ऑफमुळे कारवाईही केली होती.

त्याने मयंक अग्रवालला फ्लाईंग किस देत सेंड-ऑफ दिला होता. दरम्यान, त्याला दिल्ली विरूद्धच्या सामन्यानंतर एका सामन्याची बंदी घालण्यात आलेली.

दरम्यान, या बंदीनंतर 22 वर्षीय हर्षितला शाहरुख खानने धीर दिला होता. याबाबत इंडियन एक्सप्रेसशी बोलताना हर्षितने खुलासा केला आहे. तसेच त्याने शाहरुखने दिलेल्या शब्दाबाबतही सांगितले.

हर्षितने सांगितले की 'माझ्यावर जेव्हा एका सामन्याची बंदी लागली होती, तेव्हा मी निराश झालो होतो. त्यानंतर शाहरुख खान सर माझ्याकडे आले आणि ते मला म्हणाले, तू टेन्शन नको घेऊ, हे सेलीब्रेशन आपण ट्रॉफीसह करू.' त्याने मला शब्द दिला आणि त्याने ट्रॉफीसह आणि संघासह तसं करत शब्द पूर्णही केला.'

दरम्यान, हर्षित यंदाच्या हंगामात चांगली कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंपैकी एक आहे. त्याच्या गोलंदाजीचे कौतुक कोलकाताचा आणि ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कनेही केले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinayak Raut : उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय राऊतांकडून सुनेचा छळ?, ठाण्यात गुन्हा दाखल; नगरसेवक पतीवर गंभीर आरोप

IND vs ENG, Rankings: भारताचं १६०० दिवसांचं राज्य संपलं! इंग्लंडने मालिका विजयासह टी२० मधील नंबर १ चा ताजही हिसकावला

Shalarth ID Scam : शिक्षकांची फसवणूक करणारा रिपाइं शिक्षक आघाडीचा जिल्हाध्यक्ष गजाआड; 'शालार्थ' घोटाळ्यात नाशिक पोलिसांची मोठी कारवाई, न्यायालयात 11 हजार पानांचं दोषारोपपत्र सादर

Devendra Fadnavis: इतिहासातील सर्वांत मोठी कर्जमाफी; मुख्यमंत्र्यांचा विश्‍वास; बोगस बियाणे विक्रेत्यांवर कारवाई

Latest Marathi News Update : पुणेकरांना दिलासा! पुण्यात तूर्त पाणीकपात नाही,पुढील आठवड्यात निर्णय

SCROLL FOR NEXT