how do ipl players-get-paid-by-franchises-know-payment-system-injured-players ipl  
IPL

IPL 2023 : जखमी खेळाडूना मिळतो पूर्ण पगार, जाणून घ्या IPL मध्ये प्लेयर्सची पेमेंट सिस्टिम

संपूर्ण हंगामात बाहेर पडणे हा मोठा धक्का मानला जातो कारण...

सकाळ ऑनलाईन टीम

IPL 2023 : इंडियन प्रीमियर लीगचा हंगाम सुरू होण्यापूर्वी आणि हंगामादरम्यान खेळाडूंच्या दुखापतीचा सिलसिला चालूच आहे. जागतील सर्वात महागड्या टी-20 लीगमधील कोणत्याही खेळाडूसाठी संपूर्ण हंगामात बाहेर पडणे हा मोठा धक्का मानला जातो, कारण अशा परिस्थितीत फ्रँचायझीकडून येणाऱ्या त्यांच्या पैशाचं काय होणार?

जर एखादा खेळाडू त्याच्या फ्रँचायझीसाठी सर्व सामन्यांमध्ये उपलब्ध असेल तर त्याला पूर्ण पैसे मिळतील, मग त्याने कितीही सामने खेळले असले तरीही. लिलावाच्या वेळी फ्रँचायझीने संघात समाविष्ट केलेल्या खेळाडूला संपूर्ण पैसे मिळतात. मात्र, हे पेमेंट खेळाडूला कसे द्यायचे हे फ्रँचायझी ठरवते.

आयपीएलमध्ये जेथे काही फ्रँचायझी त्यांच्या खेळाडूंना हंगाम सुरू होण्यापूर्वी पूर्ण रक्कम देतात. तेथे काही संघ असे आहेत जे सुरुवातीला अर्धी रक्कम देतात आणि उर्वरित रक्कम स्पर्धेच्या शेवटी देतात. दुसरीकडे दुखापतग्रस्त खेळाडूंबद्दल बोलायचे झाले तर त्यांच्या पेमेंटबाबत वेगळी प्रक्रिया अवलंबली जाते.

आयपीएल हंगाम सुरू होण्याआधीच जर एखादा खेळाडू दुखापतीमुळे बाहेर पडला, तर त्याला फ्रँचायझीकडून कोणत्याही प्रकारचे पैसे दिले जाणार नाहीत. जे ऋषभ पंतच्या बाबतीत दिसून येते, कारण तो खूप पूर्वी दुखापतग्रस्त आहे.

एका सामन्यानंतर संपूर्ण हंगामासाठी बाहेर गेलेला केन विल्यमसनला फ्रँचायझीकडून वैद्यकीय खर्चासह त्याच्या संपूर्ण दिले जातात, कारण खेळाडू खेळताना किंवा दुखापत झाल्यास त्याची संपूर्ण परतफेड केली जाते.

याशिवाय, काही खेळाडू फ्रँचायझीसाठी मर्यादित सामने खेळण्यासाठी उपलब्ध असल्यास, त्यांना सामन्यांच्या संख्येनुसार पैसे दिले जातात. चेन्नई सुपर किंग्जचा बेन स्टोक्स संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध नसल्याचा दावा अनेक अहवालात केला जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitish Kumar Cabinet : नितीश कुमार मंत्रिमंडळात असणार दोन उपमुख्यमंत्री अन् २० मंत्र्यांचा समावेश!

Pune Politics : राज ठाकरेंनी अपमान केलेल्या अभिनेत्याचा भाजप प्रवेश

Angar Election: राष्ट्रवादीच्या उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद का झाला? 'या' होणार बिनविरोध नगराध्यक्ष?

IND W vs BAN W: वर्ल्ड कप जिंकल्यानंतर होणारी भारतीय संघाची मालिका BCCI कडून स्थगित! जाणून घ्या सविस्तर

Ranji Trophy: महाराष्ट्राचा एकाच डावाने दणदणीत विजय; विकी ओत्सावल अन् राजवर्धन हंगारगेकरच्या मिळून ११ विकेट्स

SCROLL FOR NEXT