Rohit Sharma | IPL  Sakal
IPL

Rohit Sharma: 'आशा आहे रोहित चेन्नईमध्ये जाईल...', माजी इंग्लंड कर्णधाराचं मोठं वक्तव्य, CSK कॅप्टन्सीबद्दलही केलं भाष्य

Mumbai Indians Captain: रोहित शर्माने पुढीलवर्षी आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सकडून खेळावं असं मत इंग्लंडचा माजी कर्णधाराने व्यक्त केले आहे.

Pranali Kodre

Rohit Sharma News : इंडियन प्रीमियर लीग 2024 आधी मुंबई इंडियन्स संघात झालेला नेतृत्व बदल गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. मुंबईने या आयपीएल हंगामापूर्वी संघाच्या नेतृत्वपदी रोहित शर्माला हटवत हार्दिक पांड्याची नियुक्ती केली. त्यामुळे अनेक चाहत्यांना हा निर्णय पटला नाही.

मुंबईचा पाचवेळचा आयपीएल विजेता कर्णधार रोहितला हटवून हार्दिकला कर्णधार केल्याने मुंबईच्या संघव्यावस्थापनेवरही मोठ्या प्रमाणात टीका झाली, इतकेच नाही तर स्टेडियममध्ये प्रेक्षकांकडूनही हार्दिकची हुर्यो उडवण्यात आली.

आता या घटनानंतर रोहित पुढीलवर्षी मुंबई इंडियन्स संघ सोडणार की नाही, याबाबत चर्चांना उधाण आले. अनेकांनी रोहितने चेन्नई सुपर किंग्स संघात जावे किंवा सरायझर्स हैदराबाद संघात जावे, असंही म्हटलं.

त्यातच आता इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननेही अस म्हटलं आहे की रोहितने चेन्नई संघात जावे आणि नेतृत्वही करावे.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की आयपीएल 2024 पूर्वी चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने नेतृत्वपद सोडत ही जबाबदारी ऋतुराज गायकवाडच्या खांद्यावर सोपवली आहे.

रणवीर अलाहबादिया होस्ट करत असलेल्या बिअरबायसेप्स पॉडकास्टमध्ये बोलताना वॉन म्हणाला, 'रोहित चेन्नई संघात जाईल आणि धोनीची जागा घेईल? गायकवाड यावर्षी नेतृत्व करत आहे, कदाचित रोहितने पुढीलवर्षी जबाबदारी सांभाळेपर्यंत हा एक मार्ग असू शकतो. मी रोहितला चेन्नईमध्ये पाहातो.'

याशिवाय रणवीरने म्हटले की चाहत्यांसाठी रोहितला नेतृत्वपदावरून काढणे निराशाजनक होते. तसेच त्याने म्हटले की रोहित यापूर्वी डेक्कन चार्जर्सकडून खेळला असल्याने तो जर हैदराबाद संघात गेला, तरी आनंदच आहे.

तथापि, वॉनने हार्दिक पांड्यालाही समर्थन दिले आहे. तो म्हणाला, 'हार्दिक सध्या कठीण काळातून जात आहे आणि ही त्याची चूक नाही. त्याला मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करण्यासाठी सांगितले गेले, यासाठी कोण नाही म्हणेल?'

'त्याला एक असे काम देण्यात आले, जे करायला कोणत्याही भारतीय क्रिकेटपटूला आवडेल. मुंबई इंडियन्ससाठी काही वर्षे कठीण राहिली आहेत, मला वाटतं की काही गोष्टी योग्य झाल्या नाहीत.'

वॉनने पुढे म्हटले की 'मला वैयक्तिकरित्या रोहितला नेतृत्व करताना पाहायला आवडेल. हार्दिक मुंबई इंडियन्समध्ये येणे हाच मोठा दबाव होता आणि रोहित भारताच्या टी२० संघाचीही कर्णधार असणार आहे, हे जाहीरच आहे.'

दरम्यान, रोहित आगामी टी२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व करेल, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी यापूर्वीच दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Success Story : जळगाव रेल्वे स्टेशनवर सापडलेली माला झाली 'महसूल सहायक', नोकरीच्या पहिल्याच दिवशी मिळणार अनोखी भेट

Nagpur News: महिला पोलिसांच्या चिमुकल्यांना मिळणार ‘चिमणीघर’ची माया; पोलिस आयुक्तांकडून उद्‍घाटन, बंद पडलेले ‘पाळणाघर’ पुन्हा सुरू

धक्कादायक घटना! 'सुरक्षारक्षकाचा पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार'; बेलतरोडीतील सिंगापूर कॉलनीतील घटना, नागपूर जिल्ह्यात खळबळ

Cough Syrup: चिमुकल्यांच्या मृत्यूनंतर सरकारला अॅक्शन मोडमध्ये, औषधांच्या गुणवत्तेबद्दल आणि वापरावर मोठा निर्णय घेतला

Latest Marathi News Live Update: सरकारी जमिनीवर बांधलेल्या बेकायदेशीर बांधकामांवर प्रशासनाने तोडफोड मोहीम

SCROLL FOR NEXT