india vs pakistan SAKAL
IPL

IND vs PAK : मोका मोका! भारत-पाकिस्तान यांच्यात खेळल्या जणार 5 एकदिवसीय सामने; जाणून घ्या कसे

Kiran Mahanavar

India vs Pakistan : आयसीसी एकदिवसीय विश्वचषक 2023 ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात भारतीय भूमीवर होणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार 5 ऑक्टोबरला इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यातील सामन्याने वनडे वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. या विश्वचषकात पाकिस्तानचा संघही सहभागी होणार आहे. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ब्लॉकबस्टर सामना 15 ऑक्टोबरला (रविवार) होण्याची शक्यता आहे.

असं असलं तरी जगभरातील क्रीडाप्रेमी भारत-पाकिस्तान सामन्याची वाट पाहत असतात. खराब राजनैतिक संबंधांमुळे दोन्ही देश सध्या फक्त आयसीसी स्पर्धा किंवा आशिया कपमध्येच भिडतात. अशा परिस्थितीत जेव्हा जेव्हा दोन्ही संघ मैदानावर आमनेसामने असतात तेव्हा ते एक अद्भुत दृश्य असते. बघितले तर यावर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यात पाच सामने होऊ शकतात.

आधी आशिया कप 2023 मध्ये दोन्ही संघ भिडतील. आशिया कप सप्टेंबर महिन्यात आयोजित केला जाणार आहे, जरी स्थळ आणि वेळापत्रक अद्याप जाहीर केले गेले नाही. यावेळी आशिया कप एकदिवसीय स्वरूपात खेळल्या जाणार असून त्यात 6 संघांचा समावेश आहे. हे संघ भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश आणि नेपाळ असतील. हे सर्व संघ दोन गटात विभागले जाणार आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय संघाच्या गटात पाकिस्तान आणि नेपाळचा समावेश अपेक्षित आहे.

गट टप्प्यात सर्व संघ त्यांच्या गटातील उर्वरित संघांविरुद्ध प्रत्येकी एक सामना खेळतील. यानंतर दोन्ही गटातील टॉप-2 संघ सुपर फोरसाठी पात्र ठरतील. सुपर-फोर टप्प्यात राऊंड रॉबिन पद्धतीने एकूण 6 सामने 4 संघांमध्ये खेळले जाणार आहेत. यानंतर दोन संघ अंतिम फेरीत पोहोचतील आणि त्यांच्यामध्ये विजेतेपदाचा सामना खेळला जाईल. अशाप्रकारे आशिया चषक 2023 मध्ये अंतिम सामन्यासह एकूण 13 सामने खेळले जातील.

म्हणजेच आशिया कपत भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वन ऑन वन सामना निश्चित दिसत आहे. त्यानंतर आशिया चषक स्पर्धेत दोन्ही संघ सुपर फोरमध्ये पोहोचतील अशी आशा आहे, अशा स्थितीत दोन्ही संघ पुन्हा भिडतील. सध्याचा फॉर्म पाहता आशिया कपमध्येही भारत-पाकिस्तान फायनल होऊ शकते. एकंदरीत आशिया कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात तीन सामने होऊ शकतात.

त्यानंतर एकदिवसीय विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार आहे. त्या विश्वचषकात दोन्ही संघांनी चमकदार कामगिरी केली, तर उपांत्य/अंतिम सामन्यातही दोन्ही संघ भिडतील. अशा परिस्थितीत आशिया चषक आणि एकदिवसीय विश्वचषक एकत्र केले तर भारत आणि पाकिस्तानमध्ये जास्तीत जास्त पाच सामने होऊ शकतात.

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील शेवटची द्विपक्षीय मालिका 2012-13 मध्ये खेळली गेली होती. त्यानंतर पाकिस्तानी संघ भारत दौऱ्यावर आला. त्यावेळी दोन्ही संघांमध्ये 2 टी-20 आणि 3 एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळली गेली होती. टी-20 मालिका 1-1 अशी बरोबरीत होती. तर एकदिवसीय मालिकेत पाकिस्तानी संघ 2-1 ने जिंकला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 1st Test: टी ब्रेक संपला, केएल राहुल मैदानात आला, पण एकही बॉल न खेळला रिटायर्ड हर्ट झाला... नेमकं घडलं काय?

Marathi News Live Updates : भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या आणि त्याचे पॅकेजिंग करणाऱ्या एका संशयास्पद युनिटवर छापा

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे जेवायला रेस्टॉरंटमध्ये गेले, ताटात नकली पनीर आढळलं; पुढे काय झालं? आयुक्तांनी कारवाईचा किस्साच सांगितला!

Video: संपूर्ण 'वंदे मातरम्' गायनावर सोनिया गांधींनी खरंच आक्षेप घेतला होता का? नेमकं काय घडलं? काँग्रेसचं स्पष्टीकरण

महिलांविषयीचा 'तो' प्रश्न आणि स्पर्धकाने खेळ सोडला; बरोबर उत्तराने मिळाले असते ५० लाख; तुम्हाला येतंय का उत्तर?

SCROLL FOR NEXT