IPL 2024 Auction  esakal
IPL

IPL 2024 Auction : लिलावासाठी नोंदणी करण्याची आज शेवटची तारीख; कमिन्स, हेडवर असणार सर्वाधिक लक्ष

अनिरुद्ध संकपाळ

IPL 2024 Auction Players Registration : इंडियन प्रीमियर लीग 2024 चा मिनी लिलाव हा दुबईत 19 डिसेंबरला होणार आहे. या लिलावासाठी अवघे तीन आठवडे शिल्लक राहिले असून आज 30 नोव्हेंबर ही खेळाडूंसाठी त्यांची लिलावासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे.

यंदाच्या लिलावात ऑस्ट्रेलियाचे स्टार खेळाडू पॅट कमिन्स, ट्रॅविस हेड, मिचेल स्टार्क यांच्यावर सर्वांचे लक्ष असणार आहे.

क्रिकबझने दिलेल्या माहितीनुसार आयपीएल 2024 च्या लिलावासाठी पात्र होण्याकरिता खेळाडूंना त्यांच्या क्रिकेट बोर्डाचे ना हरकत प्रमाणपत्र देखील जोडावे लागणार आहे. यंदाच्या मिनी लिलावात जवळपास 700 खेळाडू नोंदणी करतील असा अंदाज आहे.

ऑस्ट्रेलियासोबतच न्यूझीलंडचा स्टार परफॉर्मर रचिन रविंद्र, अफगाणिस्तानचा इब्राहीम जादरान, रहमत शाह यांनी देखील भारतात झालेल्या वर्ल्डकपमध्ये धमाकेदार कामगिरी केली आहे. यंदाच्या आयपीएल लिलावात सर्व संघ या खेळाडूंच्या मागे हात धुवून लागतील यात शंका नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: मुलं म्हणतील, आई-वडिलांनी पैसे घेऊन मत विकले... राज ठाकरेंनी सांगितलं लाडकी बहीण योजनेच्या 1500 रुपयांचं गणित?

ZP Election Date News : जिल्हा परिषद निवडणुकीची घोषणा कधी? इच्छुक उमेदवारांमध्ये अस्वस्थता

Ajit Pawar Pune Manifesto: पुण्यात मोफत मेट्रो अन् मोफत बस देणार, अजित पवारांचं पुणेकरांना आश्वासन! दोन्ही राष्ट्रवादीचा जाहीरनामा प्रसिद्ध

Gold Rate Today : खरेदीदारांना धक्का! अमेरिकेच्या ‘मी’पणामुळे सोनं-चांदी उसळली; आज खरेदी करायची असेल तर आधी हे दर पाहाच!

WPL 2026 मध्ये आज Gujarat Giants चा UP Warriors विरुद्ध सामना, मागील कामगिरी सुधारण्याकडे दोन्ही संघाचं लक्ष्य; आज कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT