IPL Hat Trick Record 
IPL

IPL Hat Trick Record : भारतीयांचीच हवा! पाहा संपूर्ण यादी

आयपीएलमध्ये हॅटट्रिकच्या यादीत भारतीय गोलंदाजांचा दबदबा

सुशांत जाधव

IPL Hat Trick Record : मुबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या हर्षल पटेलनं हॅटट्रिकचा पराक्रम करुन दाखवला. आयपीएलच्या आतापर्यंतच्या इतिहासातील ही 20 वी हॅटट्रिक ठरली. आयपीएलमध्ये हॅटट्रिक नोंदवणारा हर्षल पटेल हा सतरावा खेळाडू आहे. आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा हॅटट्रिक करण्याचा विक्रम हा अमित मिश्राच्या नावे आहे. त्याच्यापाठोपाठ भारताच्याच युवराज सिंगने दोन वेळा हॅटट्रिकचा पराक्रम केला आहे.

अमित मिश्रा

2008 मध्ये आयपीएलच्या पहिल्या हंगामात दिल्ली डेअरडेव्हिल्सकडून (सध्याचा दिल्ली कॅपिटल्स) खेळताना डेक्कन चार्जर्स (सध्याचे नाव सनरायझर्स हैदराबाद) विरुद्ध अमित मिश्राने पहिली हॅटट्रिक नोंदवली होती. 2011 मध्ये डेक्कन चार्जर्सकडून खेळताना त्याने किंग्ज इलेव्हन पंजाब (सध्याचा पंजाब किंग्ज) विरुद्ध हॅटट्रिक केली. 2013 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना मिश्राने पुन्हा पंजाब विरुद्ध तिसऱ्यांना विक्रमी हॅटट्रिक नोंदवली होती.

युवराज सिंग

भारतीय संघाचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याने 2009 च्या हंगामात दोन वेळा हॅटट्रिक घेतली होती. किंग्ज इलेव्हन पंजाब (सध्याचे नाव पंजाब किंग्ज) कडून खेळताना त्याने पहिल्यांदा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध हॅटट्रिकचा पराक्रम केला. याच हंगामात डेक्कन चार्जर्स विरुद्ध त्याने सलग तीन विकेट घेतल्या होत्या.

हर्षल पटेल

हर्षल पटेलसह आयपीएल स्पर्धेत 10 भारतीय खेळाडूंनी प्रत्येकी एकदा हॅटट्रिक घेतली आहे. असा पराक्रम नोंदवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत 7 खेळाडू हे परदेशी आहेत. भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्मा, प्रविण तांबे, श्रेयस गोपाळ, हर्षल पटेल, एल बालाजी, जयदेव उनाडकट, अक्षर पटेल, प्रविण कुमार यांचा समावेश आहे. तर परदेशी खेळाडूंमध्ये शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया), मखाया अँटिनी (दक्षिण आफ्रिका), अजित चंडेला (श्रीलंका), सॅम्युअल बद्री (वेस्ट इंडिज), अँड्रू टाय (ऑस्ट्रेलिया), सॅम कुरेन (इंग्लंड) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: पुण्यात एकनाथ शिंदेंकडून 'जय गुजरात'ची घोषणा; अमित शाहांच्या उपस्थितीत नारेबाजी, व्हिडिओ व्हायरल

Katraj Issues : सोपानकाकानगरमध्ये नागरी सुविधांचा अभाव, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी; तीन वर्षांपासून करत भरुनही महापालिकेचे दुर्लक्ष

Agriculture News : ऊस पिकावर हुमणीच्या प्रादुर्भावाचा धोका; कृषी विभागातर्फे प्रभावी उपाययोजना करण्याचे आवाहन

Women Empowerment: घरच नव्हे, गावही चालविणार! छप्पन्न गावांत लवकरच महिलाराज, १११ ग्रामपंचायतींचे आरक्षण जाहीर

IND vs ENG 2nd Test: हॅरी ब्रूकने 'खांद्या'ने वाचवली स्वतःची विकेट! लढवली अक्कल, पण झाला असता त्याचाच गेम; रिषभ पंत भडकला

SCROLL FOR NEXT