Chris Gayle  
IPL

ये बाबा IPL कोण खेळणार? म्हणे पाकिस्तानला जातोय!

ख्रिस गेलच्या एका ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सुशांत जाधव

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या एका निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट पुन्हा संकटात सापडले आहे. 18 वर्षानंतर पाकिस्तान दौऱ्यावर गेलेल्या न्यूझीलंडने सुरक्षिततेचे कारण देत पाकिस्तान विरुद्धचा दौरा आयत्यावेळी रद्द केला. न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाच्या या निर्णयावर पाकिस्तानचे आजी-माजी खेळाडू नाराजी व्यक्त करत असताना ख्रिस गेलच्या एका ट्विटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

न्यूझीलंडचा 34 सदस्यीय संघ दौरा रद्द करुन पुन्हा मायदेशी परतण्यासाठी शनिवारी रात्रीच पाकिस्तानहून दुबईला पोहचला. यादरम्यान UAE त असलेल्या ख्रिस गेलने एक ट्विट केले. मी पाकिस्तानला चाललोय. माझ्यासोबत कोण कोण येणार? क्रिस गेलने केलेले या ट्विटची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली असून त्याचे ट्विट चांगलेच व्हायरल होत आहे.

वेस्ट इंडिजमधील कॅरेबियन प्रिमीयर लीगमधील चॅम्पियन संघाचा सदस्य ख्रिस गेल आयपीएल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी युएईमध्ये दाखल झालाय. पंजाब किंग्जकडून तो मैदानात उतरणार आहे. आपल्या हटके पोस्टने सर्वांचे मनोरंजन करणाऱ्या गेलने मजेशीर अंदाजात पाकिस्तानला जाणार असे म्हटले आहे.

कॅरेबियन लीग स्पर्धेत ब्रावोच्या नेतृत्वाखालील सेंट किट्स आणि नेविस पॅट्रिओट्स संघाने जेतेपद पटकावले होते. याच संघाचा गेल सदस्यही होता. या स्पर्धेत गेलने 9 डावात 165 धावा केल्या होत्या. 42 धावांची त्याने सर्वोच्च खेळी केली होती. पंजाबकडून धमाका करण्यापूर्वी सोशल मीडियावर त्याने हास्य फुलवणारी बॅटिंगच केलीये असे म्हणावे लागेल. न्यूझीलंड संघाने पाकिस्तान विरुद्धचा दौरा रद्द करुन त्यांना टेन्शन दिले असताना गेलने पाकिस्तानची फिरकीच घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ममतांचे निकटवर्तीय आणि विधानसभेच्या माजी उपसभापतींचा संशयास्पद मृत्यू, लटकलेल्या अवस्थेत पक्ष कार्यालयातच आढळला मृतदेह

IND vs SL 1st Test: लोकेश राहुलची पहिल्या कसोटीतून माघार? दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास विलंब; नेमकं काय घडलं?

ICC 2027 World Cup Date: गांधी जयंतीला सुरू होतोय वर्ल्ड कप अन् फायनल...! नवीन फॉरमॅट, नवीन चुरस; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Marathi News Live Updates : वैद्यकीय एमबीबीएस आणि बीडीएसच्या प्रवेश पहिली यादी २५ ऑगस्ट रोजी जाहीर होणार

CAG Report : रेल्वे स्थानकातील पाणी पिता? CSMT, कल्याण, लोणावळ्यातही तपासणी; कॅगच्या अहवालात धक्कादायक खुलासा

SCROLL FOR NEXT