CSK vs DC
CSK vs DC 
IPL

VIDEO : बाराव्या खेळाडूमुळे चेन्नईचे वाजले बारा!

सुशांत जाधव

IPL 2021, CSK vs DC : दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर शेवटच्या षटकापर्यंत रंगतदार झालेल्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. माफक धावांचे टार्गेट दिल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने सामन्यात दमदार कमबॅक केल्याचे पाहायला मिळाले. 15 व्या षटकात शार्दूल ठाकूरने एकाच षटकात दोन विकेट घेत सामन्यात ट्विस्ट आणला. 14 व्या षटकात दिल्लीच्या धावफलकावर 4 बाद 98 धावा होत्या. 15 व्या षटकात शार्दुलने अवघी एक धाव देत दोन विकेट घेतल्या. संघाचे शतक पूर्ण होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सने 6 विकेट गमावल्या.

अखेरच्या चार षटकात दिल्ली कॅपिटल्सला 33 धावांची आवश्यकता होती. चेन्नई सुपर किंग्जने जबरदस्त कमबॅक केले होते. पण सामना जिंकण्यासाठी त्यांना हेटमायर नावाचा अडथळा दूर करण्यात अपयश आले. त्याला बाद करण्याची आयती संधी चेन्नई सुपर किंग्जने मोक्याच्या क्षणी गमावली. दिल्लीच्या संघाला सामना जिंकण्यासाठी 18 चेंडूत 28 धावा हव्या होत्या त्यावेळी धोनीनं चॅम्पियन डिजे ब्रावोच्या हाती चेंडू सोपवला.

ब्रावोनं आपल्या पहिल्या षटकाची सुरुवात वाइड चेंडू टाकून अवांतर धाव देत केली. या षटकातील त्याच्या दुसऱ्या चेंडूवर हेटमारयने खणखणीत चौकार खेचला. मग ब्रावो पुन्हा विस्कटला आणि त्याने आणखी एक चेंडू वाइड टाकला. पण या षटकातील तिसऱ्या चेंडूवर हेटमायरने पुन्हा एकदा मोठा फटका खेळला. यावेळी चेंडू फिल्डरपर्यंत पोहचला.

बारावा खेळाडू म्हणून क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरलेल्या कृष्णाप्पा गौतमनं हातात आलेला झेल सोडला. हाच मॅचच टर्निंग पॉइंट ठरला. हा कॅच झाला असता तर मॅचसह दोन गुण चेन्नईच्या खात्यात जमा झाले असते. जिथं विकेट मिळायला पाहिजे होती तिथे दिल्ली कॅपिटल्सला चार धावा मिळाल्या.

ब्रावोच्या या षटकात दिल्लीच्या खात्यात 12 धावा मिळाल्या. कॅच सुटला त्यावेळी हेटमायर अवघ्या 12 धावांवर खेळत होता. त्याने या सामन्यात मॅच विनिंग खेळी केली. तो 18 चेंडूत 28 धावा करुना नाबाद राहिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT