Faf-Du-Plessis-Catch 
IPL

Video: भन्नाट! सीमारेषेवर डु प्लेसिसने चेंडू पाहून घेतली उडी

विराज भागवत

चेंडू हवेत वेगाने येताना दिसताच डू प्लेसिसने झेप घेतली अन्...

IPL 2021 CSK vs KKR: महेंद्रसिंग धोनीच्या CSK संघाविरूद्ध कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कोलकाता संघाचा सलामीवीर शुबमन गिल याला एकदा जीवदान मिळाले पण पुढच्याच चेंडूवर तो धावबाद झाला. त्यानंतर फॉ्र्मात असलेला व्यंकटेश अय्यरही स्वस्तात बाद झाला. कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गन याने धावगती वाढवण्याचा प्रयत्न केला, पण फाफ डू प्लेसिसना अफलातून झेल घेत त्याला माघारी धाडला.

कोलकाता संघाची धावसंख्या ९ षटकात २ बाद ७० इतकी झाली होती. कर्णधार मॉर्गन मैदानात होता. धोनीने आपल्या संघाचा सर्वोत्तम गोलंदाज जोश हेजलवूडला गोलंदाजीसाठी आणला. त्याला पहिल्याच चेंडूवर फटका मारायचा आणि त्याची गोलंदाजीची लाईन बिघडवायची असा त्याचा प्लॅन होता. पण, त्याने मारलेल्या फटक्यावर फाफ डू प्लेसिसने भन्नाट झेल टिपला. सीमारेषेवर चेंडू हवेत दिसताच डू प्लेसिसने झेप घेतली आणि भन्नाट कॅच घेतला.

दरम्यान, मॉर्गन बाद झाल्यावर पाठोपाठ राहुल त्रिपाठी ४५ धावांवर बाद झाला. आंद्रे रसलदेखील स्वस्तात बाद झाला. त्यामुळे धावसंख्या फारशी होणार नाही असा चाहत्यांचा अंदाज होता. पण दिनेश कार्तिकने ११ चेंडूत ३ चौकार आणि एका षटकारासह २६ धावा केल्या. कार्तिक आणि नितिश राणाच्या ३७ धावांच्या जोरावर कोलकाताने १७१ धावांपर्यंत मजल मारली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : कामातचं नाही सोशल मीडियावरही तुकाराम मुंढेंचा जलवा; देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, विश्वास नांगरे- पाटलांना टाकलं मागे

Nipani Tavandi Ghat Case : राष्ट्रीय महामार्गावरील तवंदी घाटाजवळ दगडाने ठेचून गडहिंग्लज साखर कारखान्यातील कर्मचाऱ्याचा खून; महमदवर धारदार शस्रानेही हल्ला

China Nepal Border: मृत्यूचे तांडव डोळ्यांसमोर पाहतोय! प्रत्यक्षदर्शीचा अनुभव; चीन-नेपाळ सीमेवर अडकले राज्यातील ४०० भाविक

Marathi News Live Updates : २०२७च्या जनगणनेत ओबीसींसाठी स्वतंत्र रकान्याची मागणी, राज्यस्तरीय मोर्चासह देशव्यापी आंदोलनाची तयारी

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

SCROLL FOR NEXT