Hardik-Pandya-MI 
IPL

IPL 2021: हार्दिक पांड्या संघात का नव्हता? कोचने दिलं उत्तर

विराज भागवत

CSK विरूद्धच्या सामन्यात रोहित आणि हार्दिकला दिली होती विश्रांती

IPL 2021 MI vs CSK: रविवारपासून सुरू झालेल्या दुसऱ्या टप्प्यात (2nd Phase) चेन्नई सुपर किंग्जने (CSK) मुंबईला (Mumbai Indians) २० धावांनी पराभूत केले. ऋतुराज गायकवाडच्या (Ruturaj Gaikwad) नाबाद ८८ धावांच्या जोरावर चेन्नईने १५६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पोलार्डच्या (Kieron Pollard) नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला २० षटकात केवळ १३६ धावाच करता आल्या. मुंबईच्या संघात रोहित शर्माला विश्रांती देण्यात आली. तो कसोटी मालिका खेळत होता, त्यामुळे कदाचित त्याला विश्रांती देण्यात आली होती. पण, हार्दिक पांड्याला संघात स्थान का देण्यात आले नाही? असा प्रश्न साऱ्यांना पडला होता. त्याचे उत्तर मुंबई इंडियन्सचे मुख्य प्रशिक्षक महेला जयवर्धने यांनी दिले.

"हार्दिक पांड्या हा गेले अनेक दिवस सामने खेळलेला नाही. हार्दिकने श्रीलंकेविरूद्ध टी२० मालिका खेळली होती. त्यानंतर हार्दिकने मुंबई इंडियन्सच्या कँपमध्ये सरावाला सुरूवात केली होती. पण सराव करताना त्याच्या पायाच्या दुखापतीने थोडीशी उचल खाल्ली. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आम्ही त्याला एका सामन्याची विश्रांती दिली. तो लवकरच पूर्णपणे तंदुरूस्त होईल. त्याची दुखापत फारशी गंभीर नाही", अशी माहिती जयवर्धने यांनी दिली.

रोहित शर्मालाही देण्यात आली होती विश्रांती

चेन्नईविरूद्धच्या सामन्यासाठी मुंबईचे नेतृत्व रोहित शर्मा नव्हे तर कायरन पोलार्डने केले. पोलार्ड टॉसच्या वेळी आला तेव्हा सारेच आश्चर्यचकित झाले. पोलार्ड रोहितबद्दल काय बोलतो याकडे साऱ्यांचे लक्ष होते. मुंबई इंडियन्सचे चाहते पोलार्डच्या उत्तराकडे डोळे लावून बसले होते. तेव्हा पोलार्ड म्हणाला की रोहित तंदुरूस्त आहे. मी केवळ आजच्या सामन्यापुरता कर्णधार म्हणून आलो आहे. पुढच्या सामन्यांमध्ये रोहितच टॉसच्या वेळी उपस्थित असेल, असं पोलार्ड म्हणाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT