IPL

Video: पोलार्डने जाडेजाला दिला दणका! लगावला उत्तुंग षटकार

विराज भागवत

जाडेजाने पोलार्डच्या पायाजवळच टाकला होता टप्पा

IPL 2021 MI vs CSK: युएईमध्ये रंगलेल्या IPLच्या दुसऱ्या टप्प्यात चेन्नईच्या संघाने विजयी सलामी दिली. चेन्नईने मुंबई संघावर २० धावांनी विजय मिळवला. ऋतुराज गायकवाडच्या नाबाद ८८ धावांच्या जोरावर चेन्नईने १५६ धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना पोलार्डच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या संघाला २० षटकात केवळ १३६ धावाच करता आल्या. त्यामुळे मुंबईला पराभवाचे तोंड पाहावे लागले. पण सामन्यात कायरन पोलार्डने रविंद्र जाडेजाला लगावलेला उत्तुंग षटकार विशेष चर्चेचा विषय ठरला.

मुंबईला दिलेल्या १५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांची सुरूवात खराब झाली. क्विंटन डी कॉक, अनमोलप्रीत सिंग, इशान किशन आणि सूर्यकुमार यादव हे चौघे स्वस्तात बाद झाले. त्यानंतर कर्णधार कायरन पोलार्ड खेळायला आला. रविंद्र जाडेजाने त्याला पायाजवळ टप्पा टाकला आणि त्याने अतिशय उत्तुंग असा षटकार लगावला. चेंडू पायाजवळून वळेल अशी जाडेजाची अपेक्षा होती, पण पोलार्ड जाडेजावर भारी पडला.

पाहा व्हिडीओ-

पोलार्डने एकमेव मोठा फटका खेळला. त्यानंतर पोलार्ड पायचीत झाला. सौरभ तिवारीने एक बाजू पूर्णवेळ लावून धरली होती. पण त्याला मोक्याच्या क्षणी धावगती वाढवणं शक्य झालं नाही. त्याने ५ चौकारांसह ४० चेंडूत ५० धावा केल्या. बाकी कोणत्याही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. ब्राव्होने ४ षटकात २५ धावा काढल्या आणि ३ गडी बाद केले. ५८ चेंडूत नाबाद ८८ धावा करणारा ऋतुराज गायकवाड सामनावीर ठरला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime: भावजयचे दिरासोबत अनैतिक संबंध, जाऊबाई संतापली, भर पंचायतीत ॲसिडची बाटली आणली अन्...; धक्कादायक कृत्य

Latest Marathi News Live Update : जैन मुनि नयपद सागर यांच्या ताराराणींबाबतच्या वक्तव्यावरून वाद वाढला

मोठे अपडेट्स : IPL मध्ये १० नव्हे १२ संघांमध्ये जेतेपदाची स्पर्धा रंगणार? BCCI चा मास्टर प्लान, शंभरच्या आसपास लढती होणार...

'दारु प्यायचो, मासांहार करायचो, दिवसाला 200 सिगारेट ओढायचो' अमिताभ बच्चन यांनी केलेला खुलासा, म्हणालेले...'इतकी दारू प्यायचो की...'

2011 World Cup India Team: २०११ फायलनच्या भारताच्या प्लेइंग इलेव्हनमधील हिरो आत्ता काय करतात, दोन खेळाडू अद्यापही IPL खेळतात

SCROLL FOR NEXT