IPL

Video: बुमरा का जबाव नहीं! KKRच्या गिलची 'अशी' केली दांडी गुल

विराज भागवत

बुमराहने सोडलेला चेंडू शुबमन गिलला कळलाच नाही अन्...

IPL 2021 MI vs KKR: मुंबईच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली. सलामीवीर रोहित शर्मा आणि क्विंटन डी कॉक यांनी दमदार सुरुवात मिळवून दिली होती. पण रोहित शर्मा ३३ धावांवर बाद झाला आणि संघाची धावगती मंदावली. त्यानंतर डी कॉकने एकाकी झुंज देत ५५ धावांची खेळी केली. त्याच्या खेळीमुळे संघाला १५०पार मजल मारता आली. या आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताने चांगली सुरूवात केली होती. पण जसप्रीत बुमराहच्या स्मार्ट गोलंदाजीपुढे शुबमन गिल फिका पडला.

शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर हे दोघे कोलकाताकडून डाव सुरू करण्यासाठी आले. दोघांनीही धडाकेबाज सुरूवात केली होती. या दोघांनी ३ षटकांत कोलकाताला ४० धावा करून दिल्या. पण जसप्रीत बुमराहने अतिशय योग्य वेळी गिलचा काटा काढला. तिसऱ्या षटकात तो गोलंदाजी करत असताना त्याने शुबमन गिलला एका संथ गतीचा चेंडू टाकला. तो चेंडू खेळणं गिलला जमलं नाही. नक्की काय होतंय हे समजेपर्यंत चेंडू स्टंपवर आदळला आणि गिल ची दांडी गुल झाली.

पाहा व्हिडीओ-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: जगातील प्रत्येक १३ पैकी एक देश अमेरिकेच्या रडारवर; ट्रम्प यांच्याकडून 'या' देशांना उद्ध्वस्त करण्याची धमकी

Latest Marathi News Live Update : नसरापूरमधील चिमुरडीवर अत्याचार; आरोपीविरुद्ध दोषारोप निश्चित, खटल्याची रोज सुनावणी होणार

Muslim Gorakshak Dal : 'गाय राष्ट्रीय पशू झालीच पाहिजे'; मिरजेत मुस्लिम गोरक्षक दलाकडून जनजागृती मोहीम, 'गांधीगिरी' करत दिला गोसंरक्षणाचा संदेश!

IPL 2026: वैभव सूर्यवंशीला Orange Cap च्या शर्यतीत ३ खेळाडू देणार टक्कर... विराट कोहली या शर्यतीतही शेवटून पहिला, किती धावांचे अंतर?

MLC Election: जागेसाठी महायुतीत चढाओढ! शिंदेंनंतर फडणवीसांची दिल्लीवारी; पीएम मोदींसोबतच्या बैठकीमागे काय?

SCROLL FOR NEXT