Venkatesh-Iyer-KKR 
IPL

Video: व्यंकटेश अय्यरची खेळी पॉवरफुल; मुंबईची झाली बत्ती गुल

विराज भागवत

कोलकाताच्या अय्यरने बुमराह, बोल्ट, चहर साऱ्यांचीच केली धुलाई

IPL 2021 MI vs KKR: कोलकाताने मुंबईवर ७ गडी राखून विजय मिळवला. मुंबईने सलामीवीर क्विंटन डी कॉक याने अर्धशतकी खेळीच्या (५५) जोरावर २० षटकात ६ बाद १५५ धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग कोलकाताचा शुबमन गिल लवकर बाद झाला. पण कोलकाता संघाचा दुसरा सलामीवीर व्यंकटेश अय्यर (५३) आणि राहुल त्रिपाठी (७४*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर KKR ने मुंबईवर धडाकेबाज विजय मिळवला.

कोलकाताचा व्यंकटेश अय्यर याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरूद्धच्या सामन्यात आपल्या खेळीची झलक दाखवली होती. त्याने त्या सामन्यात नाबाद ४१ धावा केल्या होत्या. आज मुंबईविरूद्ध त्याला मोठी खेळी करण्याची संधी मिळाली. त्याने पॉवर प्ले च्या सहा षटकांत तुफान फटकेबाजी केली. ट्रेंट बोल्ट, अडम मिल्न, जसप्रीत बुमराह, राहुल चहर, कृणाल पांड्या साऱ्याच गोलंदाजांचे चेंडू त्याने सीमारेषेपार पोहोचवले. त्याच्या दमदार खेळीच्या जोरावर त्याने IPL मधील आपले पहिले अर्धशतक ठोकले. त्याने ३० चेंडूत ४ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५३ धावांची खेळी केली.

पाहा त्याच्या खेळीची झलक-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs NZ: जो रुट सचिन तेंडुलकरच्या विश्वविक्रमाच्या आणखी जवळ पोहचला! कसोटीत 'असा' पराक्रम करणारा जगातील दुसराच ठरला

T20 World Cup 2026: ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या विजयानं टीम इंडियाला मोठा धक्का! सेमीफायनलमध्ये जाण्यासाठी चूरस वाढली

FDC drugs ban: मोठा निर्णय! केंद्राकडून १६ प्रकारच्या‘एफडीसी’ औषधांवर बंदी; 'या' मेडिसिन्सचा समावेश

Aditya Thackeray: ''गेलेल्यांना माघारी यायचं असेल तर...'' उद्धव ठाकरेंचा निरोप देत, आदित्यंचं मोठं विधान, काय म्हणाले?

Rohit Sharma चं टेन्शन वाढणार... कर्णधार शुभमन गिलने अफगणिस्तानविरुद्धच्या विजयानंतर दिलाय इशारा

SCROLL FOR NEXT