Ravi Bishnoi vs Suryakumar Yadav
Ravi Bishnoi vs Suryakumar Yadav 
IPL

VIDEO : 'सूर्या'च्या खेळीला पुन्हा ग्रहण; रविनं उडवल्या दांड्या

सुशांत जाधव

IPL 2021, MI vs PBKS : पंजाब किंग्जने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) पुन्हा एकदा तारांबळ उडाली. पंजाबचा फिरकीपटू रवि बिश्नोईनं (Ravi Bishnoi) एकाच षटकात रोहित शर्मा (Rohit Sharma) 8 (10) आणि त्याच्यापाठोपाठ सुर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) तंबूत धाडत मुंबई इंडियन्सला अडचणीत आणले. गुडघ्यावर बसून स्लोगस्विपचा रोहितचा प्रयत्न फसल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी सुर्यकुमार यादव मैदानात आला. रवि बिश्नोईनं त्याला आल्यापावली माघारी धाडले. रविने अप्रतिम गूगलीवर त्याच्या दांड्या उडवल्या.

रवि बिश्नोईनं टाकलेला चेंडू खेळताना सुर्यकुमार यादवच्या बॅट आणि पॅडमध्ये हातभर अंतर होते. सुरेख पद्धतीने टाकून वळवलेला चेंडूचा सुर्यकुमारला अजिबात अंदाज घेता आला नाही. त्याला शून्यावर माघारी परतावे लागले. मध्यफळीतील रटाळ कामगिरीमुळे मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या आयपीएल हंगामात संघर्ष करताना दिसत आहे. सुर्यकुमारने पुन्हा एकदा त्यात भर घातली.

भात्यात मोठे फटके असलेल्या सुर्यकुमार यादवला यंदाच्या हंगामात नावाला साजेसा खेळ करता आलेला नाही. प्रत्येक सामन्यात तो प्लेइंग इलेव्हनचा भाग आहे. 11 सामन्यात त्याने एका अर्धशतकासह केवळ 189 धावा केल्या आहेत. यात 56 ही त्याची सर्वोच्च खेळी आहे.

युएईत झालेल्या मागील हंगामात त्याने 400 + धावा केल्या होत्या. 16 सामन्यात त्याने 4 अर्धशतकाच्या मदतीने 480 धावा केल्या होत्या. यात 79 धावांची खेळी सर्वोच्च होती. मात्र यंदाच्या संपूर्ण हंगामात तो सातत्याने अपयशी ठरताना दिसतोय.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: वादळी वाऱ्यामुळे लोणी-काळभोरमध्ये बँड पथकावर होर्डिंग कोसळलं, घोडा गंभीर जखमी

IPL 2024 RCB vs CSK Live Score: बेंगळुरू चेन्नई प्लेऑफच्या एका जागेसाठी भिडणार, पण पावसाचे अंदाज काय?

'मोठं होऊन पंतप्रधान व्हाल', ज्योतिषीने केली होती भविष्यवाणी; प्रियांका गांधींनी सांगितला किस्सा

Virat Kohli: भारतीय संघात संधी मिळण्यासाठी रैनाची कशी झाली मदत? विराटनं सांगितली 16 वर्षांपूर्वीची आठवण

Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींनी रायबरेली, अमेठीत प्रचार करणे टाळले, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT