KL Rahul
KL Rahul 
IPL

IPL 2021: राहुलचा CSKला दणका; 'प्ले-ऑफ्स'मध्ये चुरस वाढली!

विराज भागवत

राहुलने ८ षटकारांसह कुटल्या तब्बल ९८ धावा

IPL 2021 CSK vs PBKS: पंजाबचा कर्णधार लोकेश राहुल याच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर पंजाबने चेन्नईवर अवघ्या १३ षटकात विजय मिळवला. चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १३४ धावा केल्या होत्या. त्या आव्हानाचा पाठलाग करताना लोकेश राहुलने ४२ चेंडूत नाबाद ९८ धावा केल्या. पंजाबने या विजयासह १२ गुणांसह आपल्या नेट रनरेटमध्ये सुधारणा केली. आता उर्वरित तीन सामन्यांमध्ये जर कोलकाताने राजस्थानला पराभूत केले आणि मुंबईच्या संघाचाही उद्या पराभव झाला तर पंजाबला प्ले ऑफ्सचे तिकीट नक्की मिळू शकते.

असा रंगला सामना..

चेन्नईच्या संघाने प्रथम फलंदाजीला सुरूवात केली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड १२ धावांत माघारी परतला. मोईन अली (०), रॉबिन उथप्पा (२), अंबाती रायडू (४) आणि धोनी (१२) या साऱ्यांनीही वाईट कामगिरी केली. पण सलामीवीर फाफ डू प्लेसिसने एक बाजू लावून धरत दमदार अर्धशतक ठोकलं. त्याने ५५ चेंडूत ७६ धावांची खेळी केली. त्यानंतर जाडेजा (नाबाद १५) आणि ब्राव्हो (नाबाद ४) यांनी संघाला २० षटकात ६ बाद १३४ धावांपर्यंत मजल मारू दिली.

या आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या पंजाबला सामना जिंकण्यासोबतच नेट रनरेटचेही आव्हान होते. त्या दृष्टीने लोकेश राहुलने डावाची सुरूवात केली. त्याने तडाखेबाज खेळी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. मयंक अग्रवाल (१२), सर्फराज खान (०), शाहरूख खान (८) आणि एडन मार्क्रम (१३) हे चौघे चांगली कामगिरी करू शकले नाहीत. पण राहुलने एक बाजूने खिंड लढवली. त्याने ४२ चेंडूत तब्बल ७ चौकार आणि ८ षटकारांसह नाबाद ९८ धावा कुटल्या आणि संघाला विजय मिळवून दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

क्रिकेट विश्वात उडाली मोठी खळबळ! T20 World Cupवर दहशतवादी हल्ल्याचे संकट, पाकिस्तानमधून आली धमकी

ED Raid Video : झारखंडमध्ये ईडीची मोठी कारवाई; अनेक ठिकाणांवर मारली रेड, नोटांचा डोंगर बघून अधिकारीसुद्धा चक्रावले

Share Market Today: शेअर बाजारात नफा कमावण्याची मोठी संधी; आज 'या' 10 शेअर्सवर ठेवा लक्ष

Latest Marathi News Update : नाशिकच्या गंगापूर रोडवरील ICICI बँकेत चोरी

Nashik Crime News : बँकेच्या सेफ्टी लॉकरमधील 5 कोटींचे दागिन्यांवर डल्ला! घरफोडीचा गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT