IPL Points Table 
IPL

IPL Points Table : राजस्थानच्या विजयानं प्लेऑफच्या शर्यतीत ट्विस्ट

राजस्थान रॉयल्सने चेन्नईला पराभूत करत प्ले ऑफच्या शर्यतीत नवा ट्विस्ट निर्माण केलाय.

सुशांत जाधव

आयपीएलच्या 14 व्या हंगामातील स्पर्धेतील दुसऱ्या टप्प्यातील सामने युएईच्या मैदानात खेळवण्यात येत आहेत. सहा संघांनी 12 सामने खेळले असून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायझर्स हैदराबाद आज 12 वा सामन खेळणार आहेत. या सामन्यानंतर प्रत्येक संघाचे केवळ दोन सामने शिल्लक राहतील. चेन्नई सुपर किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन संघांनी प्ले ऑफमध्ये स्थान पक्के केले आहे. दुसरीकडे राजस्थान रॉयल्सने चेन्नईला पराभूत करत प्ले ऑफच्या शर्यतीत नवा ट्विस्ट निर्माण केलाय.

सध्याच्या घडीला रॉयल चॅलेंजर्स बंगलुरु प्ले ऑफमधील स्थान निश्चित करण्यापासून केवळ एक विजय दूर आहे. सनरायझर्स हैदराबादला पराभूत करुन ते 16 गुणांसह पात्रता सिद्ध करतील. पण जर या सामन्यात उलटफेर झाला तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची प्रतिक्षा आणखी वाढू शकते.

प्ले ऑफच्या दोन जागेसाठी पाच संघ तगडी फाईट देताना दिसते. यातील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसाठी प्ले ऑफचा मार्ग सोपा आहे. त्यांना तीन पैकी केवळ एक सामना जिंकायचा आहे. दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज, राजस्थान रॉयल्स आणि मुंबई इंडियन्स या संघांनी प्रत्येकी 10-10 गुण मिळवले आहेत. या सर्व संघांना उर्वरित दोन सामने जिंकून प्ले ऑफमध्ये आपले स्थान निश्चित करता येऊ शकते. या संघाने विजय मिळवताना उत्तम रन रेट लक्षात घेऊन खेळावे लागेल.

टीम मॅच विजय पराभव टाय अनिर्णित गुण नेट रनरेट

चेन्नई सुपर किंग्स Q 12 9 3 0 0 18 +0.829

दिल्ली कॅपिटल्स Q 12 9 3 0 0 18 +0.551

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु 11 7 4 0 0 14 -0.200

कोलकाता रायडर्स 12 5 7 0 0 10 +0.302

पंजाब किंग्ज 12 5 7 0 0 10 ;0236

राजस्‍थान रॉयल्‍स 12 6 6 0 0 12 -0.337

मुंबई इंडियन्स 12 5 7 0 0 10 -0.453

सनरायझर्स हैदराबाद 11 2 9 0 0 4 -0.490

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Protest: सीजेपीच्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले, पण घरी परतलेच नाहीत; शिवाजी पार्कात ७५ वर्षीय वृद्धाचा मृत्यू

Puttu Recipe: इडली पात्रात बनवा चविष्ट 'पुट्टू'! केरळच्या घराघरांत बनणारा पौष्टिक पदार्थ; पाहा सोपी रेसिपी...

Tembhurni Crime : गाडी पार्किंगच्या कारणावरून सुरू असलेले भांडण सोडविण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून; दोन संशयित आरोपींना अटक

Degloor Crime : बनावट ग्राहकाच्या सापळ्यात मोटारसायकल चोर जेरबंद; १० चोरीच्या दुचाकींसह एक आरोपी ताब्यात, एक फरार

Badnapur News : ‘साहेब, शेतकऱ्यांना भरीव मदत द्या, जनावरांसाठी चारा द्या’; वरुडीतील शेतकऱ्यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे आर्जवी मागणी

SCROLL FOR NEXT