IPL

Video : नारायण...नारायण! विराट-एबीचा सेम टू सेम बोल्ड

महत्त्वपूर्ण सामन्यात नारायणच्या फिरकीत दिसली जादू

सुशांत जाधव

RCB vs KKR , Eliminator Match : शारजाच्या मैदानात टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुवर अष्टपैलू सुनील नारायण भारी पडला. त्याने बंगळरुच्या चार तगड्या फलंदाजांना स्वस्तात माघारी धाडले. यात कर्णधार विराट कोहलीसह, श्रीकर भरत, एबी डिव्हिलियर्स आणि मॅक्सवेल यांच्या विकेटचा समावेश आहे. नारायणने आपल्या चार षटकात अवघ्या 21 धावा करुन चार महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून विराट कोहलीने सर्वाधिक 39 धावांची खेळी केली.

कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्यातील अपडेट्स

श्रीकर भरतच्या रुपात सुनील नारायणने आपली पहिली विकेट घेतली. तो 9 धावा करुन माघारी फिरला. व्यंकटेश अय्यरने त्याचा झेल टिपला. विराट कोहलीच्या रुपात मोठा मासा नारायणच्या गळाला लागला. नारायणने त्याला अप्रतिमरित्या बोल्ड केले. त्याची जागा घेण्यासाठी आलेल्या एबीलाही त्याने बोल्ड केले. एबी डिव्हिलियर्स आणि विराट कोहलीचा 'सेम टू सेम' बोल्ड उडाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर मॅक्सवेलही एक मोठा फटका मारण्याच्या नादात झेलबाद झाला.

सुनील नारायनला यंदाच्या हंगामात 12 सामन्यात संधी मिळाली. यात त्याने 14 विकेट्स घेतल्या असून एलिमिनेटर लढतीत त्याने कमालीची कामगिरी नोंदवली. यंदाच्या हंगामातील त्याची ही सर्वोच्च कामगिरीही ठरली. आयपीएलमध्ये चौथ्यांदा त्याने चार एका डावात चार विकेट घेतल्या आहेत. 2013 मध्ये त्याने 13 धावा खर्च करुन 4 विकेट मिळवल्या होत्या. 2014 आणि 2015 मध्ये त्याने अनुक्रमे 19 आणि 20 धावा करत चार बळी टिपले होते. 2012 च्या हंगामात 19 धावांत 5 बळी ही नारायणची आयपीएलमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इराणसोबतचा संघर्ष भारत अन् चीनला रोखण्यासाठी, इराणच्या अधिकाऱ्याने सगळंच सांगितलं, अमेरिकेला सुनावलं

Safe Investment : अमेरिका–इराण युद्धाने शेअर बाजार हादरला! घाबरू नका… या 6 गुंतवणुकीत तुमचे पैसे राहतील सुरक्षित

Latest Marathi News Live Update : पुण्यासह राज्यात उन्हाचा तडाखा, सलग दोन दिवस कमाल तापमानाने पस्तीशी ओलांडली

Budget 2026: यंदा राज्य सरकारची कसरत! तूट, कर्जामुळे योजना व विकासाचा समतोल साधण्याचे आव्हान

Nashik Municipal Corporation : नाशिक मनपाचा शेअर बाजारात डंका! २०० कोटींच्या 'ग्रीन बॉण्ड'ला ५४० कोटींचा प्रतिसाद

SCROLL FOR NEXT