yashasvi jaiswal
yashasvi jaiswal 
IPL

VIDEO : CSK च्या गोलंदाजांची 'यशस्वी' धुलाई

सुशांत जाधव

अबुधाबी : चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धने दिलेल्या धावांचा पाठलाग करताना राजस्थान रॉयल्सचा युवा फलंदाज यशस्वी जयस्वालनं (Yashasvi Jaiswal) धमाकेदार खेळी केली. सीएसके (CSK) विरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या 19 चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. टी 20 कारकिर्दीतील त्याचे हे पहिलं वहिलं अर्धशतक आहे. आपल्या अर्धशतकीय खेळीत त्याने 6 चौकार आणि 3 उत्तुंग षटकार खेचल्याचे पाहायला मिळाले. 42 धावा त्याने बाउंड्रीच्या स्वरुपात केल्या. हेजलवूड घेऊन आलेल्या राजस्थानच्या डावातील पाचव्या षटकात यशस्वी यादवने ऑस्ट्रेलियन गोलंदाजाची चांगलीच धुलाई केली. या षटकात त्याने 3 षटकार आणि 1 चौकारासह 22 धावा कुटल्या. या ओव्हरमध्ये षटकाराने त्याने अर्धशतकाला गवसणी घातली.

राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसन याने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्यांदा फलंदाजी करताना चेन्नई सुपर किंग्जने निर्धारित 20 षटकात 4 बाद 189 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जचा सलामीचा फलंदाज ऋतूराज गायकवाडने 101 धावांची नाबाद खेळी केली.

प्लेऑफच्या आशा पल्लवित करण्यासाठी राजस्थानला सामना जिंकणे गरजेचे होते. चेन्नईने 190 धावांचे आव्हान दिल्यानंतर एविन लुईस आणि यशस्वी जयस्वालने राजस्थानला धमाकेदार सुरुवात करुन दिली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 32 चेंडूत 77 धावांची भागीदारी केली.

यशस्वी जयस्वाल 21 चेंडूत 50 धावा करुन बाद झाला. केएम आसिफने त्याच्या वादळी खेळीला ब्रेक लावला. या सामन्यापूर्वी यशस्वीनं 15 टी 20 सामन्यात 22 च्या सरासरीने 330 धावा केल्या होत्या. 49 ही त्याची सर्वोच्च धावसंख्या होती. 21 लिस्ट ए सामन्यात त्याने 52 च्या सरासरीने 987 धावा केल्या आहेत. यात 3 शतक आणि 4 अर्धशतकांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Salman Khan: सलमान खानच्या घरावरील गोळीबार प्रकरण! एका आरोपीचा पोलीस कोठडीत आत्महत्येचा प्रयत्न, प्रकृती गंभीर

Monsoon Season : यंदा 'मॉन्सून' लवकरच हजेरी लावणार; हवामानतज्ज्ञांचा अंदाज, उष्णतेमुळे पाण्याचे बाष्पीभवन वेगाने

Changpeng Zhao: बिनन्सच्या संस्थापकाला तुरुंगवास; जगातील सर्वात श्रीमंत क्रिप्टो एक्सचेंजमध्ये नेमकं काय झालं?

नाशिकचा सस्पेन्स संपला ! हेमंत गोडसे यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर, शांतिगिरी महाराजांना धक्का

Latest Marathi News Live Update: मनेका गांधींनी भरला उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT