David Warner  
IPL

IPL 2021: वॉर्नरसह केदार भाऊलाही बसवलं बाकावर!

या खेळाडूंना आगामी हंगामात संघ आपल्यासोबत ठेवणार का?

सुशांत जाधव

सनरायझर्स हैदराबाद संघाचे स्पर्धेतील आव्हान जवळपास संपुष्टात आले आहे. दुसऱ्या बाजूला राजस्थानचा संघ प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी मैदानात उतरला आहे. डेविड वॉर्नर हा आयपीएलमध्ये 150 सामने खेळणारा तिसरा परदेशी खेळाडू आहे. गत हंगामापासूनच त्याच्या भात्यातून धावा होताना दिसत नाही. तो एका-एका धावेसाठी संघर्ष करताना दिसला. परिणामी पहिल्यांदा त्याची कॅप्टन्सी गेली आणि त्यानंतर आता त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळवण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे.

चेन्नई सुपर किंग्जने रिलीज केल्यानंतर केदार जाधव हैदराबादच्या संघाकडून खेळत आहे. यंदाच्या हंगामात त्याला 6 सामन्यात संधी मिळाली. यात त्याने केवळ 55 धावा केल्या. मागील हंगामातही त्याला आपल्यातील क्षमता सिद्ध करण्यात अपयश आले होते. युएईच्या मैदानात पार पडलेल्या सामन्यात त्याला 8 सामन्यात संधी मिळाली यात त्याने केवळ 62 धावा केल्या. यात 26 ही त्याची सर्वोच्च खेळी होती.

डेविड वॉर्नरने यंदाच्या हंगामात 8 सामने खेळले. यात दोन अर्धशतकासह त्याने 195 धावा केल्या आहेत. 57 ही वॉर्नरची यंदाच्या हंगामातील सर्वोच्च खेळी आहे. मागील हंगामात त्याने 16 सामन्यात 400+ धावा केल्या होत्या. त्याच्या कामगिरीतील उणीव हैदराबाद संघासाठी चांगलीच महागात पडली आहे. केन विल्यमसनच्या नेतृत्वाखालील संघाचा यावेळीची कामगिरीही लाजीरवाणी अशीच राहिली आहे. 9 पैकी केवळ एकच सामना त्यांनी जिंकला आहे. आगामी हंगामानंतर आयपीएलचा मेगा लिलाव पार पडणार आहे. यावेळी हैदराबादच्या संघात मोठा बदल होण्याची शक्यता आहे. यावेळी फ्रेंचायझी वॉर्नरवर भरवसा दाखवणार का? केदार जाधव पुन्हा आयपीएल खेळताना दिसणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shraddha Kapoor: अडीचशे कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूरचा भाऊ अडचणीत; 25 तारखेला हजर राहण्याचे आदेश

Talegaon Election : तळेगाव दाभाडेत नगराध्यक्ष पदासाठी तिरंगी लढत; १९ नगरसेवक बिनविरोध, उर्वरित ९ जागांसाठी २३ उमेदवार रिंगणात!

Pune Crime : टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर आंदेकर टोळीतील आरोपींची धिंड

Pune News : महापालिकेतील उपायुक्तांच्या पुन्हा बदल्या, अधिकारी धास्तावले

Daund Election : दौंड नगरपालिका निवडणूक तापली; नगराध्यक्षपदासाठी सहा महिला, तर सदस्यपदासाठी तब्बल ८६ उमेदवार रिंगणात!

SCROLL FOR NEXT