Dinesh-Karthik-Six-Video 
IPL

Video: दिनेश कार्तिकने थेट स्टेडियमच्या बाहेर मारला षटकार

विराज भागवत

तुम्ही पाहिलात का त्याचा 'हा' फटका?

IPL 2021 KKR vs RR: राजस्थान विरूद्धच्या अतिमहत्त्वाच्या सामन्यात कोलकाताच्या संघाने धडाकेबाज फलंदाजी केली. शारजाच्या मैदानावर कोलकाताने २० षटकात १७१ धावा कुटल्या आणि राजस्थानला १७२ धावांचे आव्हान दिले. शुबमन गिलने संघाला धडाकेबाज सुरूवात करून दिली. त्याच्या ५६ धावांच्या खेळीमुळे संघाला चांगली सुरूवात मिळाली. तर दिनेश कार्तिक आणि इयॉन मॉर्गन जोडीने शेवटच्या षटकांमध्ये तुफान फटकेबाजी करत संघाला १७०पार मजल मारली. त्यातही कार्तिकच्या षटकाराची विशेष चर्चा रंगली.

दिनेश कार्तिक जेव्हा खेळायला आला तेव्हा मुस्तफिजूर रहमान गोलंदाजी करत होता. कार्तिकला मुस्तफिजूरने वेगवान चेंडू टाकला. कार्तिकनेदेखील त्या चेंडूचा चांगलाच समाचार घेतला. चेंडू कार्तिकच्या शरीराजवळ जात असताना त्याने जोरदार तडाखा मारला. त्याने लगावलेला षटकार थोडाथोडका नव्हे तर थेट स्टेडियमच्या बाहेर गेला.

पाहा Video:

दरम्यान, नाणेफेक गमावलेल्या कोलकाता संघाला आजच्या सामन्यात मोठा विजय आवश्यक असताना सलामीवीरांनी दमदार सुरूवात केली. शुबमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी तुफान फटकेबाजी केली. अय्यरने ३८ तर शुबमन गिलने ५६ धावा केल्या. हे दोघे बाद झाल्यानंतर नितीश राणा (१२) आणि राहुल त्रिपाठी (२१) झटपट बाद झाले. अखेर दिनेश कार्तिक (नाबाद १३) आणि मॉर्गनने (नाबाद १४) संघाला १७१ धावांपर्यंत मजल मारून दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पाण्यात अडकलेल्या तरुणाची रेस्क्यू टीमने केली सुटका

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT