IPL 2022 Sakal
IPL

IPL शो बोरिंग? TV रेटिंगमध्ये मोठी घसरण

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलचा 15 वा हंगाम सध्या सुरु आहे. यंदाच्या स्पर्धेत दोन अधिक संघांचा समावेश करुन आयोजकांनी स्पर्धेतील रंगत वाढवण्याचा निर्णय घेतलाय. या दोन संघाच्या आगमनामुळे क्रिकेट प्रेमींचा प्रतिसाद आणखी वाढेल अशी आशा बीसीसीआय (BCCI) आणि ब्रॉडकास्टरचे अधिकार असलेल्या मंडळींना होती. पण पहिल्या आठवड्यातील प्रतिसाद आयोजकांसह ब्रॉडकास्टर्संना दणका देणारा असाच आहे. (IPL TRP News)

आयपीएल (IPL 200) स्पर्धेच्या पहिल्या आठवड्यात गत हंगामाच्या तुलनेत कमी प्रतिसाद मिळाला आहे. टीव्ही viewership मध्ये जवळपास 30 टक्के इतकी घसरण झाली आहे. इनसाइड स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेतील पहिल्या आठवड्यातील सामन्यांचे टीव्ही रेटिंग 2.52 इतके आहे. गत हंगामातील पहिल्या आठवड्यातील टीव्ही रँकिंग 3.85 इतके होते. तर 2020 चे रेटिंग हे 3.75 इतके होते.

मागील वर्षी जवळपास 267.7 मिलियन लोकांनी टीव्ही सेटच्या माध्यमातून सामन्यांचा आनंद घेतला. हा आकडा या हंगामाच्या पहिल्या आठवड्यात 229.06 मिलयनवर आलाय. मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही लोकप्रिय संघ सुरुवातीच्या सामन्यापासून संघर्ष करताना दिसत आहे. या दोन संघाचा फटकाही viewership वर पडल्याचे दिसते. याशिवाय आणखी एक वेगळे कारण टीव्ही रेटिंग डाउन होण्याचे असू शकते. ते म्हणजे पर्सनल मोबाईलवर अनेकजण सामन्याचा आनंद घेत आहेत.

बीसीसीआयने दोन संघ वाढवून रंगत वाढवण्याऐवजी कमी केलीये, या भावनेतूनही काहींनी आयपीएल सामने पाहण्याकडे पाठ फिरवलेली असू शकते. पण ही कारण ठोस अशी नाहीत. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील पहिल्या आठवड्यात टीव्ही सेटच्या माध्यमातून चांगला प्रतिसाद मिळत नसल्यामुळे बीसीसीआयला पुढच्या हंगामासाठीच्या डीलवर याचा काय परिणाम होणार हे पाहणेही महत्त्वाचे ठरले. पुढच्या सामन्याला कसा प्रतिसाद मिळतोय यावर बीसीसीआयच्या कमाईची गणितेही अवलंबून असतील.

बीसीसीआयने 2023-27 या पाच वर्षांच्या कालावधीसाठी आयपीएल प्रेक्षपणाच्या अधिकारासाठी 33,000 कोटीची मूळ किंमत ठरवली आहे. 12 जूनला यासाठी बोली लागणार आहे. आयपीएलच्या 15 व्या हंगामातील टीव्ही रेटिंगचा या डीलवर काही परिणाम होणार नाही, असा दावा बीसीसीआयकडून करण्यात येत आहे. नेमकं काय होणार हे येणारा काळच ठरवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Motor Vehicle Rules: दहा वर्षांची गाडी समजणार जुनी; 'फिटनेस फी' दहा पटींपर्यंत वाढली, केंद्रीय मोटार वाहन नियमांत सुधारणा!

Indian Railway: सण-उत्सवात रेल्वेचा मोठा हातभार; वर्षभरात ४३ हजारांहून अधिक विशेष गाड्या!

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु

Mumbai Crime: हिंदी बोलली म्हणून ६ वर्षाच्या चिमुकलीला संपवलं; आईचं निर्दयी कृत्य, पण तपासात वेगळंच सत्य समोर आलं

Loni Kalbhor Crime : सराईत गुन्हेगार सद्दाम अन्सारीवर कडक कारवाई; एमपीडीएअंतर्गत एक वर्षासाठी स्थानबद्ध!

SCROLL FOR NEXT