चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु सामन्याच्या हायलाइट्स
171-9 : ड्वेन ब्रावोला सामन्यातील पहिलं यश
दिनेश कार्तिकच्या रुपात ब्रावोला मिळाली पहिली विकेट, कार्तिकने 14 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने केल्या 34 धावा
146-8 जडेजाच्या खात्यात आणखी एक विकेट
रविंद्र जडेजानं आकाश दीपला खातेही उघडू दिले नाही. तो रायडूच्या हाती झेल देऊन परतला
146-7 : वानिडु हसरंगाही तंबूत, आरसीबीला सातवा धक्का
चेन्नईचा कर्णधार रविंद्र जडेजा याने ख्रिस जार्डनकरवी हसरंगाला झेलबाद केले
133-6 शहाबाज अहमदच्या खेळीला ब्रेक
तीक्षणा याने शहाबाज अहमदला बोल्ड केलं. त्याने 27 चेंडूत 4 चौकाराच्या मदतीने 41 धावा केल्या
पदार्पणाच्या सामना खेळणाऱ्या सुयशच्या रुपात तीक्षणाला तिसरे यश, त्याने 18 चेंडूत केली 34 धावांची खेळी
कर्णधार रविंद्र जडेजानं मॅक्सवेलला आपल्या जाळ्यात अडकवले. मॅक्सवेलनं 11 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने खेळली 26 धावांची खेळी
अनुज रावतच्या रुपात आरसीबीने गमावली तिसरी विकेट, तीक्षणाच्या गोलंदाजीवर तो पायचित झाला. त्याने संघाच्या धावसंख्येत 12 धावांची भर घातली
मुकेश चौधरीनं कोहलीच्या रुपात आरसीबीला मोठा धक्का दिल्ला, कोहलीला केवळ एक धाव करता आली
तीक्षणानं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला दिला पहिला धक्का, फाफ ड्युप्लेसीस ख्रिस जार्डनच्या हाती झेल देऊन 8 धावा करुन परतला तंबूत
रविंद्र जडेजा हजेरी लावून अनुज रावतच्या हाती झेल देऊन तंबूत परतला. हसरंगाच्या खात्यात दुसरे यश
उथप्पाने 50 चेंडूत 4 चौकार आणि 9 षटकाराच्या मदतीने कुटल्या 88 धावा
सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत शिवम दुबे आणि रॉबिन उथप्पाने आपल्या भात्यातील फटकेबाजीनं संघाला सावरले. दोघांनी शतकी भागीदारीसह अर्धशतके झळकावली
सलामीवीर ऋतूराज गायवाड स्वस्तात माघारी फिरल्यानंतर मोईन अलीनं रन आउटच्या रुपात विकेट फेकली. दोन विकेट पडल्यावर मैदानात उतरलेल्या शिवम दुबनं सलामीवीर रॉबिन उथप्पाच्या साथीनं संघाचा डाव सावरणारी खेळी केली. दोघांची जोडी चांगलीच जमली आहे. दोघांनी शतकी भागीदारी करत संघाचा
ऋतूराज गायकवाड बाद झाल्यानंतर चेन्नई सुपर किंग्जने मोईन अलीला बढती दिली. मागील सामन्यात त्याने फटकेबाजी केली होती. पण या सामन्यात धावबाद होत तो अवघ्या 3 धावांवर माघारी फिरला.
आयपीएलच्या यंदाच्या हंगामात धावांसाठी संघर्ष करणाऱ्या ऋतूराजने यावेळी दुहेरी आकडा पार केला. पण 17 धावांवर हेजलवूडने त्याला तंबूचा रस्ता दाखवला.
आरसीबीचा कर्णधार फाफ ड्युप्लेसीस यांने टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईचा संघ पहिल्यांदा बॅटिंग करेल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.