IPL DC  Sakal
IPL

IPL 2022 : पॉटिंगचा युवा खेळाडूंसाठी नवा बॉडिंग फॉर्म्युला

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या स्पर्धेपूर्वी मेगा लिलावामध्ये नव्या चेहऱ्यांना संघात सामील करत दिल्ली कॅपिटल्सने मजबूत संघ बांधणी केलीये. संघाचे मुख्य कोच रिकी पॉटिंग यांनी नव्याने संघात सामील झालेल्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी रिटेन केलेल्या खेळाडूंवर सोपवली आहे. पॉटिंग यांनी युवा खेळाडूंमध्ये बॉडिंग निर्माण करण्यासाठी खास फॉर्म्युलाही तयार केलाय.

दिल्ली कॅपिटल्सच्या संघाने मेगा लिलावाआधी कर्णधार रिषभ पंत, सलामीवीरी पृथ्वी शॉ, अष्टपैलू अक्षर पटेल आणि दक्षिण आफ्रिकेचा जलदगती गोलंदाज एनरिक नॉर्किया यांना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला होता. या खेळाडूंवर नव्याने संघात समावेश झालेल्या खेळाडूंना मार्गदर्शन करण्याची मोठी जबाबदारी असेल.

पाॉटिंग यांच्या बॉडिंग फॉर्म्युल्यानुसार, त्यांनी संघातील प्रत्येक खेळाडूला आपल्या रुमचे दरवाजे खुले ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. चांगल्या बॉडिंगसाठी एकमेकांना समजून घेणे गरजेचे आहे. सकाळचा नाश्ता, दुपारचा लंच आणि रात्री डिनर सर्व युवा खेळाडूंसोबत करणार असल्याचेही रिकी पॉटिंग यांनी म्हटले आहे. कोच आणि वरिष्ठ खेळाडूंनी युवा खेळाडूंना प्रेमळपणाने वागणे गरजेचे आहे, हा देखील त्यांच्या फॉर्म्युलाचा एक भाग आहे.

जे खेळाडू बऱ्याच काळापासून दिल्ली कॅपिटल्ससोबत आहेत त्यांनी युवा खेळाडूंची जबाबादारी घ्यायला हवी. रिषभ पंत संघाचा कर्णधार आहे. त्यामुळे त्याला तर हे करणे अनिवार्यच आहे. त्याच्याशिवाय पृथ्वी, अक्षर आणि नॉर्किया यांच्यावरही युवा खेळाडूंना प्रोत्साहीत करण्याची जबाबदारी असेल, असे पाॉटिंग म्हणाले. पहिल्या प्रशिक्षण सत्रात खेळाडूंचा उत्साह पाहून त्यांनी आनंदही व्यक्त केलाय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

JP Nadda: आरक्षण हटाओ आंदोलन! शिष्टमंडळाने घेतली जेपी नड्डांची भेट; 'या' मुद्द्यांवर झाली चर्चा

Marathi News Live Updates : नेपाळमधून जी दृश्ये समोर येत आहेत, ती अत्यंत विनाशकारी आणि हृदयद्रावक आहेत - आदित्य ठाकरे

WTC 2025-27: भारतीय संघाचं गणित बिघडलं! श्रीलंकेविरुद्धच्या 'ड्रॉ'नंतर Points Table मध्ये टीम इंडिया कोणत्या स्थानावर

Marathi Language Rule: ऑटो-टॅक्सी चालकांना दिलासा! मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदत; देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय

Car Care Tips: कारमध्ये फोन चार्ज करताय? 'या' ४ चुकांमुळे मोबाईलचा ब्लास्ट अन् कारची बॅटरी होऊ शकते डेड!

SCROLL FOR NEXT