IPL 2022 DC vs KKR Ricky Ponting Angry On Umpire
IPL 2022 DC vs KKR Ricky Ponting Angry On Umpire  Sakal
IPL

रिकी पाँटिंग अंपायरच्या थेट अंगावर धावून गेला; व्हिडिओ व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022 : मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स (DC) आणि कोलकाता नाईट रायडर्स (KKR) यांच्यात रंगलेला सामना एकतर्फी झाला. दिल्ली कॅपिटल्सने 200 पार धावा करुन कोलकातासमोर आधी डोंगराऐवढे लक्ष्य ठेवले. त्यानंतर दिल्लीच्या गोलंदाजांनी कोलताच्या फलंदाजीला सुरुंग लावला. दिल्लीने 44 धावांनी सामना जिंकत स्पर्धेतील दुसरा विजय नोंदवला. दिल्लीच्या दिमाखदार विजयाला वादाचे ग्रहण लागले आहे. दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओत तो अंपायरशी हुज्जत घालताना दिसतोय. (IPL 2022 DC vs KKR Ricky Ponting Angry On Umpire)

रिकी पाँटिंग आक्रमक अंदाजात अंपायरसोबत वाद घालताना दिसते. दिल्ली कॅपिटल्सच्या डावातील 19 व्या षटकात हा सर्व प्रकार घडला. पाँटिंग अंपायरसोबत वाद घालताना दिसले. या सामन्यात मैदानातील अंपायरकडून अनेक चुकीचे निर्णय देण्यात आले. मात्र रिव्ह्यूच्या माध्यमातून फलंदाजांनी आपली विकेट वाचवण्यात यश मिळले. कोलकाताचा संघ धावांचा पाठलाग करत असताना अजिंक्य रहाणेला दोनवेळा अंपायरने बाद दिले. पण रिव्ह्यच्या माध्यमातून त्याने विकेट वाचवली. पण याचा त्याला किंवा संघाला फार फायदा झाला नाही. तो अवघ्या आठ धावा करुन तंबूत परतला.

अंपायरसोबतच्या वादाआधीच पाँटिंग ट्विटरवर करत होता ट्रेंड

पाँटिंगने सरफराज खानच्या आधी शार्दुल ठाकूरला बढती दिल्याने तो ट्विटरवर ट्रेंडमध्ये आला होता. त्याचा हा निर्णय अनेकांना खटकला होता. पण शार्दुल ठाकूरनं त्याचा हा निर्णय सार्थ ठरवला. शार्दुलनं 11 चेंडूत तुफान फटकेबाजी करत 29 धावा कुटल्या.

रिषभ पंतच्या नेतृत्वाखालील दिल्ली कॅपिटल्सचा संघ चौथा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. या सामन्यातील विजयासह त्यांच्या खात्यात आता दोन विजयाची नोंद झाली असून 4 गुणांसह ते गुणतालिकेत पाचव्या स्थानावर आहेत. दुसऱ्या बाजूला कोलकाता संघ यंदाच्या स्पर्धेत दमदार कामगिरी करताना दिसतोय. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखालील कोलकाता संघाने 5 पैकी 3 सामन्यातील विजयासह पराभवानंतरही 6 गुण मिळवत अव्वलस्थान कायम राखले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

HSC Exam Result : बारावीचा निकाल २.१२ टक्क्यांनी वाढला; कोकण विभागाचा सर्वाधिक ९७.५१

Narendra Modi : ... तर नेहरूंनी आरक्षणच दिले नसते

Pune News : विशाल अग्रवालसह चार जणांना अटक

Azamgarh Loksabha Election : ‘सप’च्या बालेकिल्ल्यात दोन यादवांमध्ये लढाई; धर्मेंद्र यादव विरुद्ध दिनेशलाल निरहुआ

Milind Deora : उद्धव ठाकरेंमुळे काँग्रेस पक्ष सोडला

SCROLL FOR NEXT