IPL 2022 | Kuldeep Yadav News
IPL 2022 | Kuldeep Yadav News sakal
IPL

IPL 2022: त्याची गुगली भल्याभल्यांना फसवणारी; कुलदीपसाठी गावसकरांची बॅटिंग

Kiran Mahanavar

IPL 2022 : कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्धच्या सामन्यादरम्यान दिल्ली कॅपिटल्सचा (DC) गोलंदाज कुलदीप यादवने चार बळी घेतले. या कामगिरीसह त्याने संघाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. 2019 मध्ये एक काळ असा होता जेव्हा कुलदीप संघर्षाचा सामना करत होता. बऱ्याच सामन्यात तो डगआउटमध्ये बेंचवर बसल्याचे पाहायला मिळाले.(IPL 2022 | Kuldeep Yadav News)

2020 च्या हंगामात तरी कोलकाता संघाकडून खेळताना त्याला फक्त चार सामन्यांमध्ये संधी मिळाली. माझ्याकडे तुम्ही दुर्लक्ष केले होते, हे कुलदीपनं कोलकाता विरुद्धही दाखवून दिले. तो चमकदार कामगिरी करत असून भारतीय संघात पुनरागमन करण्याची आपली दावेदारी तो भक्कम करताना दिसतोय. संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीत तो प्रबळ दावेदार असेल, असे मत लिटल मास्टर सुनील गावसकर यांनीही बोलून दाखवले आहे.(IPL 2022 | Sunil Gavaskar News)

स्टार स्पोर्ट्सच्या शोमध्ये सुनील गावसकर म्हणाले की, जेव्हा तुम्ही टी-20 क्रिकेटमध्ये चार विकेट्स घेता, याचा अर्थ असा होतो की तुम्ही चांगली कामगिरी केली आहे. सामन्या दरम्यान टीम कठीण परस्थितीत असते तेव्हा कुलदीपने विकेट घेतल्या. त्याची ही कामगिरी टीमसह चाहत्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण ठरली. त्याने विकेट्स घेण्यास सुरुवात केली आहे. याचाच अर्थ आता त्याची भारतीय संघात निवड होण्याची शक्यताही वाढली आहे. कुलदीप लपवून फसवी गुगली टाकतो. त्याचा चेंडू समजून घेणं सोप नाही. त्याला खेळणं कठिण आहे. सुरुवातीला तो खेळपट्टीवरून अतिशय संथ गतीने गोलंदाजी करत होता. आता तो वेगवान गोलंदाजी करत असल्याने त्याच्याविरुद्ध फलंदाजी करणे अधिक कठीण आहे, अशा शब्दांत गावसकर यांनी चायनामन कुलदीप यादववर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Telangana CM Revanth Reddy : तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांना दिल्ली पोलिसांचं समन्स; अमित शाहांच्या व्हिडीओचं प्रकरण

Sairat Complete 8 Years : मराठी सिनेमाला १०० कोटींचं स्वप्न दाखवणाऱ्या 'सैराट'ला ८ वर्षं पूर्ण; रिंकूची पोस्ट चर्चेत

Share Market Closing: शेअर बाजारात तुफान तेजी; सेन्सेक्स 900 अंकांच्या उसळीसह बंद, गुंतवणूकदार मालामाल

Latest Marathi News Live Update: भारतीय सैन्याकडे पाहून साताऱ्यातील लष्करी कुटुंबे आनंदी : PM Modi

Nashik News : मालेगावी भाजीपाल्याची आवक स्थिर! मे, जून महिन्यात उत्पादन घटण्याचा अंदाज

SCROLL FOR NEXT