Delhi Capitals Ricky Ponting
Delhi Capitals Ricky Ponting 
IPL

IPL 2022 : दिल्ली कॅपिटल्सचा पराभव; तरीही पाँटिंग हॅप्पी असण्यामागचे कारण...

Kiran Mahanavar

IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने ऋषभ पंतच्या दिल्ली कॅपिटल्सला पराभवाची धूळ चारली. या पराभवानंतरही दिल्ली कॅपिटल्सचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगला संघाकडून मोठी आशा आहे. दिल्ली कॅपिटल्स या पराभवातून सावरुन पुन्हा ट्रकवर येईल असा विश्वास त्यांना आहे. यामागे एक खास कारण आहे. दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज एनरिक नॉर्किया लवकरच इंडियन प्रीमियर लीग (IPL) मध्ये खेळण्यासाठी तंदुरुस्त होईल. लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध 7 एप्रिलला होणाऱ्या सामन्यात तो मैदानात उतरण्याची शक्यता आहे. ही गोष्ट दिल्ली कॅपिटल्ससाठी मोठा दिलासा देणारी आहे. पाठीच्या दुखापतीमुळे तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. नोर्किया गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये झालेल्या टी-20 विश्वचषकापासून एकही सामना खेळलेला नाही.(Delhi Capitals Ricky Ponting News)

गुजरात टायटन्सकडून 14 धावांनी पराभव पत्करावा लागल्यानंतर पाँटिंग पत्रकार परिषदेत म्हणाला की, नॉर्कियाने सराव सुरु केला आहे. तो त्याच्या पूर्ण क्षमतेनं गोलंदाजी करत आहे. त्याने नेटमध्ये चार-पाच स्पेल टाकले. त्यामुळे लवकर दक्षिण आफ्रिका बोर्डाकडून त्याला खेळण्याची परवानगी मिळेल, असे वाटते. आफ्रिका संघाने हिरवा गंदील दिल्यावर तो लगेच संघाला जॉईन होईल, असे दिल्लीच्या कोचनं सांगितले.

यावेळी पाँटिंगला ऑस्ट्रेलियन डेव्हिड वॉर्नर आणि मिचेल मार्शसंदर्भातही प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना पाँटिंगने वॉर्नर भारतात आल्याची माहिती दिली. पॉटिंग म्हणाला वॉर्नर मुंबईत पोहोचला आहे. मिशेल मार्श आधीच मुंबईत आहे. दोघही क्वॉरंटाईनमध्ये आहेत. क्लारंटाईनचा कालावधी पूर्ण झाल्यावर ते संघ निवडीसाठी उपलब्ध असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bhavesh Gupta:'पेटीएम'च्या अध्यक्षांचा कंपनीला रामराम, तडकाफडकी घेतला करिअर ब्रेकचा निर्णय

'मुझे क्यों तोड़ा'; कंगना रनौतने भर सभेत तेजस्वी सूर्यांवर केली टीका; नेमका काय घोळ झाला?

IPL 2024 LSG vs KKR : ४८ तासांच्या आत कोलकता पुन्हा मैदानात! लखनौ सुपर जायंटस् विरुद्ध आज सामना

Poonch Attack: 30 महिने... सहावा हल्ला अन् 21 जवानांचे बलिदान; भारतीय लष्कर सतत ठरत आहे दहशतवाद्यांचे टार्गेट

Latest Marathi News Live Update : सुनेत्रा पवार यांच्यासाठी अजित पवार यांची सांगता सभा

SCROLL FOR NEXT