Dwayne Bravo vs Lasith Malinga Sakal
IPL

MI नं उघडलं IPL चं दार; आज CSK कडून खेळताना 'नबंर वन' रेकॉर्ड

सकाळ डिजिटल टीम

IPL 2022 Record : चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यंदाच्या हंगामात संघर्षाचा सामना करत असली तरी त्यांचा स्टार अष्टपैलू ड्वेन ब्रावोनं (Dwayne Bravo) नवा विक्रम प्रस्थापित केलाय. लखनौ सुपर जाएंट्स (Lucknow Super Giants. ) विरुद्धच्या लढतीत ब्रावोनं लसिथ मलिंगाचा (Lasith Malinga) विक्रम मागे टाकत आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम आपल्या नावे केलाय.

आयपीएलच्या 15 व्या हंगामातील कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सलामीच्या लढतीत 3 विकेट्स घेत ड्वेन ब्रावोनं मलिंगाच्या आयपीएलमधील सर्वाधिक 170 विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. लखनौ विरुद्ध आता तो त्याच्या पुढे निघून गेलाय. लखनौच्या डावातील 18 व्या षटकात दिपक हुड्डाची विकेट घेत ब्रावो आयपीएलमध्ये सर्वात विकेट घेणारा गोलंदाज ठरलाय.

38 वर्षीय ब्रावोनं 153 सामन्यात 171 विकेट्स घेतल्या आहेत. मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या मलिंगाने 122 सामन्यात 170 विकेट्स घेतल्या आहेत. विशेष म्हणजे आयपीएलच्या पहिल्या हंगामात मलिंगाच्या दुखापतीमुळे ब्रावोची एन्ट्री झाली होती. मुंबई इंडियन्सने मलिंगाच्या जागी बदली खेळाडू म्हणून त्याला संघात घेतले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel-CNG Price: मुंबईत पेट्रोल-डिझेल स्वस्त तर या शहरांमध्ये दर वाढले! पाहा तुमच्या शहरातील आजचे दर

IND vs SL: भारत श्रीलंका कसोटी मालिका कुठे पाहता येणार? जाणून घ्या LIVE ब्रॉडकास्टिंग आणि स्ट्रीमिंगची संपूर्ण माहिती

Vidarbha Rain: विदर्भात आजही जोरदार पावसाचा यलो अलर्ट

Jan Vishwas Abhiyan: तक्रारी ऐकताच मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये; नागरिकांच्या तक्रारींवर तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची गदा

Marathi News Live Updates : सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आठ खासदार आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट

SCROLL FOR NEXT