esakal
IPL

गुजरातच्या विजयावर 2011 च्या वर्ल्डकप फायलनची छाप

गुजरातने आयपीएल विजेतेपद पटकावल्यानंतर क्रिकेट जगतात रंगली वर्ल्डकप २०११ ची चर्चा.

धनश्री ओतारी

आयपीएल १५ व्या सीझनमध्ये नव्याने पदार्पण केलेल्या गुजराज टायटन्स संघाने आयपीएल चॅम्पियन ट्रॉफीवर स्वतःचे नाव कोरले. गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून विजय मिळवत आपले पहिले वहिले आयपीएल विजेतेपद पटकावले. मात्र, या विजयानंतर क्रिकेट जगतात २०११ मध्ये झालले वर्ल्डकपची चर्चादेखील रंगली आहे. दोन्ही सामन्यात अनेक गोष्टींमध्ये साम्य पाहायला मिळालं.

7 नंबर जर्सीने ठोकला षटकार अन् जिंकली मॅच जिंकली

गुजरातच्या विजयात शुभमन गिलने मोलाचा वाटा उचलला. त्याने षटकार ठोकत आयपीएल चॅम्पियन ट्रॉफीवर संघाचे नाव कोरले. त्याने १९ व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर वेगवान गोलंदाज ओबेद मॅकॉय विरुद्ध षटकार ठोकला. त्याची खेळी पाहताच वर्ल्डकप २०११ ची आठवण झाली.

कारण ७ नंबर जर्सी परिधान करणारा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने वेगवान गोलंदाज नुवान कुलसेकराच्या चेंडूवर षटकार ठोकला होता. आणि वर्ल्डकप २०११ वर टीम इंडियाचे नाव कोरलं.

शुभमन गिलच्या जर्सीचा नंबरदेखील ७ आहे. दोघांनीही षटकार ठोकत मॅच खिशात घातली.

गॅरी क्रस्टन आणि नेहरा दोघे संघाचा महत्त्वाचा भाग

२०११ वर्ल्डकप दरम्यान टीम इंडियाचे मुख्य कोच दक्षिण अफ्रिकाचे गॅरी क्रस्टन होते. आणि आशीष नेहरा टीमचे भाग होता. सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध जायबंदी झाल्याने नेहरा फायनल खेळू शकला नव्हता. त्यावेळी दोघांनी विजयाचा जल्लोष साजरा केला होता.

तर आयपीएल १५ सीझनमध्ये दोघेही आयपीएल चॅम्पीयन गुजरात संघाचे महत्त्वाचे भाग आहेत. आशीष नेहरा हा संघाचा मुख्य कोच आहे तर क्रस्टन टीमचा मेंटॉर आहे.

संगकारा आणि मलिंगा, श्रीलंकेचा २०११ मध्ये पराभव

२०११ मध्ये टीम इंडियाने श्रीलंकेचा पराभव केला होता. त्यावेळी कुमार संगकारा संघाचा कर्णधार होता. लसिथ मलिंगा संघाचे प्रमुख वेगवान गोलंदाज होते.

आयपीएल १५ सीझनमध्ये दोघे राजस्थान रॉयल्स संघासोबत होते. संगकारा टीमचा डायरेक्टर ऑफ क्रिकेट आहे. तर मलिंगा गोलंदाजीचा कोच आहे. आयपीएलमध्ये सर्वात यशस्वी गोलंदाजांच्या यादीत मलिंगाचा समावेश आहे. त्यामुळं राजस्थानने त्याची यंदाच्यावर्षी गोलंदाजी कोच म्हणून नियुक्त केलं होत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: रक्षाबंधनाआधी सोनं स्वस्त! सलग तिसऱ्या दिवशी भाव घसरले, आज 10 ग्रॅमचा दर किती?

Mumbai Local: कर्मचाऱ्यांना लागला लेटमार्क! मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल खोळंबल्याने प्रवाशांची तारांबळ

LUCKY ZODIAC SIGNS: फक्त ८ दिवस थांबा! ‘या’ ३ राशींचं नशीब अचानक पलटणार; पैसा, यश अन् मोठ्या फायद्याचे संकेत ,तुमची रास कोणती?

Marathi News Live Updates : मॉडिफाइड सायलेन्सरवर पोलिसांचा कडकडीत कारवाईचा बडगा, कर्णकर्कश आवाज करणाऱ्या २२ दुचाकींवर दंडात्मक कारवाई

Sangola Water: पक्ष, गट, राजकारण बाजूला अन् शेतकरी एकवटले! सांगोल्यात पाण्याच्या लढ्याचा ‘सांगोला पॅटर्न’

SCROLL FOR NEXT