IPL 2022 Gujarat Titans vs Rajasthan Royals Final Live Cricket Score Highlights ESAKAL
IPL

IPL GT vs RR: गुजरातचा पहिल्याच हंगामात भीम पराक्रम; IPL ला मिळाला नवा विजेता

अनिरुद्ध संकपाळ

अहमदाबाद : गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 गडी राखून विजय मिळवत आपले पहिले वहिले आयपीएल विजेतेपद पटकावले. विशेष म्हणजे गुजरातचा हा पहिलाच हंगाम आहे. गुजरातने राजस्थाने 131 धावांचा आव्हान 18.1 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केला. गुजरातकडून हार्दिकने 34, गिलने 45 तर मिलरने 32 धावांची खेळी केली. राजस्थानची फलंदाजी खराब झाली. जॉस बटलरच्या 39 धावांच्या खेळीव्यतिरिक्त इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही. गुजरातकडून हार्दिक पांड्याने 17 धावात 3 तर साई किशोरने 20 धावात 2 बळी टिपले.

Highlights

युझवेंद्र चहलने आपला हंगामातला 28 वा बळी टीपला तोही गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पांड्या. पांड्या 34 धावा करून माघारी गेला आणि गिल बरोबरची त्याची 63 धावांची भागीदारी संपुष्टात आली.

23-2 : गुजरातला पॉवर प्लेमध्ये दुसरा धक्का

ट्रेंट बोल्टने मॅथ्यू वेडला 8 धावांवर बाद करत पॉवर प्लेमध्ये गुजरातला दुसरा धक्का दिला.

9-1 : प्रसिद्ध कृष्णाने दिला गुजरातला पहिला धक्का

 चहलने शुभमन गिलचा कॅच सोडला 

युझवेंद्र चहलने गुजरातचा सलामीवीर शुभमन गिलचा शुन्यावर असताना कॅच सोडला.

130-9 : राजस्थानची मजल 130 पर्यंतच

गुजरात टायटन्सने राजस्थान रॉयल्सला 20 षटकात 9 बाद 130 धावांवर रोखले. गुजरातकडून हार्दिक पांड्याने 3 तर साई किशोरने 2 विकेट घेतल्या.

112-7 : बोल्ट  11 धावांची भर घालून परतला

98-6 : अश्विन देखील माघारी

साई किशोरने रवीचंद्रन अश्विनला 6 धावांवर बाद करत राजस्थानचा सहावा फलंदाज बाद केला.

 94-5 : राजस्थानचा निम्मा संघ माघारी 

हार्दिक पांड्याने शिमरॉन हेटमायरला 11 धावांवर बाद करत आपल्या चौथ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राजस्थानला धक्का दिला. हार्दिकची ही सामन्यातील तिसरी शिकार ठरली.

 79-4 : हार्दिक पांड्याने बटलरला बाद करत दिला मोठा धक्का

हार्दिक पांड्याने राजस्थानचा अव्वल फलंदाज जॉस बटलरला 39 धावांवर बाद केले.

79-3 : देवदत्त पडिक्कल बाद 

राशिद खानने राजस्थान रॉयल्सचा फलंदाज देवदत्त पडिक्कलला बाद करत तिसरा धक्का दिला. पडिक्कलने 10 चेंडूत 2 धावा केल्या.

राजस्थानच्या 10 षटकात 71 धावा 

राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलरने दमदार फलंदाजी करत संघाला 10 षटकात 71 धावांपर्यंत पोहचवले.

कर्णधाराने कर्णधाराची केली शिकार

संजू सॅमसन आणि जॉस बटलर यांनी दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला. मात्र हार्दिक पांड्याने 14 धावांवर संजू सॅमसनला बाद केले.

राजस्थानचे अर्धशतक पार

राजस्थान रॉयल्सने पॉवर प्लेमध्ये एकच विकेट गमावून अर्धशतकी मजल मारली.

राजस्थानला पहिला धक्का 

राजस्थान रॉयल्सचा आक्रमक सलामीवीर यशस्वी जैसवालला यश दयालने 22 धावांवर बाद केले.

गुजरातच्या संघात एक बदल

गुजरात टायटन्सने आपल्या संघात एक बदल केला आहे. अल्झारी जोसेफच्या जागी लॉकी फर्ग्युसन याला संधी दिली आहे. तर संजू सॅमसनने राजस्थान रॉयल्स संघात कोणताही बदल केलेला नाही.

संजूने नाणेफेक जिंकली

संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Munde: ''...कारण आम्ही भटके आहोत'', बंजारा-वंजारा वादावरुन धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

Latest Marathi News Updates : ओबीसींचा बॅकलॉग तातडीने भरावा; सरकारचा जीआर वादग्रस्त – छगन भुजबळ

IND A vs AUS A: १९ वर्षाच्या पोराने भारतीय गोलंदाजांना झोडले, लखनौमध्ये शतक; श्रेयसचं नशीब महाराष्ट्राच्या पठ्ठ्याने त्याला OUT केले

Agricultural News : कमी खर्चात लाखोंचे उत्पन्न: इगतपुरीचे शेतकरी बांबू लागवडीकडे वळले

"यांचे अजून बारा वाजले नाहीत का ?" उपमुख्यमंत्र्यांच्या बैठीकीनंतरही रस्त्याची परिस्थिती जैसे थे ! चेतना भट्टच्या नवऱ्याचा संताप

SCROLL FOR NEXT