IPL 2022 Gujarat Titans vs Rajasthan Royals  ESAKAL
IPL

GT vs RR : पहिल्याच हंगामात गुजरातने गाठली फायनल

अनिरुद्ध संकपाळ

कोलकाता : गुजारात टायटन्सने राजस्थान रॉयल्सचा 7 विकेट राखून पराभव करत पहिल्याच हंगामात फायनलमध्ये प्रवेश केला. गुजरातने राजस्थानचे 189 धावांचे आव्हान 19.3 षटकात 3 फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. गुजरातकडून डेव्हिड मिलरने 38 चेंडूत नाबाद 68 धावा चोपत सामना जिंकून दिला. त्याने शेवटच्या षटकात विजयासाठी 16 धावांची गरज असताना सलग तीन षटकार मारत सामना जिंकून दिला. त्याला हार्दिक पांड्याने 40 धावा करून चांगली साथ दिली.

Highlights

शेवटच्या षटकात मिलरने सलग तीन षटकार मारत सामना संपवला

डेव्हिड मिलरने शेवटच्या षटकात 16 धावांची गरज असताना प्रसिद्ध कृष्णाला सलग तीन षटकार मारत सामना संपवला. त्याने 38 चेंडूत नाबाद 68 धावा केल्या. त्याला हार्दिक पांड्याने 27 चेंडूत 40 धावा करून चांगली साथ दिली. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली.

मिलरचे दमदार अर्धशत

हार्दिक पांड्या - डेव्हिड मिलरची अर्धशतकी भागीदारी 

हार्दिक पांड्या आणि डेव्हिड मिलर यांनी चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचत सामना जवळ आणला.

85-3 : मॅकॉयने वेडचा अडसर केला दूर

30 चेंडूत 35 धावा करणाऱ्या मॅथ्यू वेडला मॅकॉयने बाद करत गुजरातला तिसरा धक्का दिला.

72-2 : सेट झालेला गिल धावबाद झाला

पहिल्याच षटकात सेटबॅक बसल्यानंतर शुभमन गिल आणि मॅथ्यू वेडने भागीदारी रचण्यास सुरूवात केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागीदारी रचली. मात्र 21 चेंडूत 35 धावा करणारा शुभमन गिल धावबाद झाला.

0-1 : गुजरातला पहिल्याच षटकात धक्का

ट्रेंट बोल्टने गुजरातला पहिल्याच षटकात धक्का दिला. त्याने सलामीवीर वृद्धीमान साहाला भोपळाही न फोडता माघारी परतला.

बटलरच्या 89 धावा राजस्थानच्या 20 षटकात 6 बाद 188 धावा 

जॉस बटलरने 56 चेंडूत 89 धावांची खेळी करत राजस्थानला 188 धावांपर्यंत पोहचवले.

161-4 : हेटमायर 4 धावांवर बाद 

जॉस बटलरचे दमदार अर्धशतक

राजस्थानचा सलामीवीर जॉस बटलरने सावध सुरूवात करत संघाला 150 च्या जवळ पोहचवले. त्याने सेट झाल्यानंतर आक्रमक फलंदाजी करत त्याने आपले अर्धशतक देखील पूर्ण केले.

116-3 : हार्दिक पांड्याने पडिक्कलला धाडले माघारी

हार्दिक पांड्याने जॉस बटलर आणि देवदत्त पडिक्कलची जोडी फाडली. त्याने पडिक्कलला 28 धावांवर बाद केले.

79-2 : संजू सॅसमनची खेळी साई किशोरने संपवली

जॉस बटलर आणि संजू सॅमसन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 68 धावांची भागीदारी रचली. मात्र साई किशोरने ही जोडी फोडली. त्याने 26 चेंडूत 47 धावा करणाऱ्या संजू सॅमसनला बाद केले.

11-1 : राजस्थानला पहिला धक्का 

राजस्थानला यश दयालने पहिला धक्का दिला. त्याने यशस्वी जैसवालला 3 धावांवर बाद केले.

दोन्ही संघात कोणताही बदल नाही.

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्सने आपल्या प्लेईंग इलेव्हनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

गुजरातने नाणेफेक जिंकली

गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न

SCROLL FOR NEXT