Hardik Pandya 
IPL

पांड्या यो यो टेस्ट पास; गोलंदाजी वेळी 135 kmph वेगाने फेकले चेंडू

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू हार्दिक पांड्या मागील काही दिवसांपासून फिटनेसच्या मुद्यावरुन चर्चेत आहे. इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी तो बंगळुरुस्थित राष्ट्रीय अकादमीत दाखल झाला होता. त्याच्यासाठी यो-यो टेस्ट अनिवार्य करण्यात आली होती. या चाचणीवरच तो आयपीएल खेळणार की नाही, याचा फैसला होणार होता. यासंदर्भातील मोठी अपडेट समोर आलीये. NCA मध्ये झालेल्या फिटनेस टेस्टमध्ये हार्दिक पांड्या उत्तमरित्या पास झालाय. यावेळी त्याने गोलंदाजीही केल्याचे समजते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) ने मर्यादित षटकांच्या आगामी व्यस्त वेळापत्रकाच्या पार्श्वभूमीवर खेळाडूंची फिटनेस चाचणी घेण्याचा निर्णय घेतला होता. आयपीएलच्या 15 व्या हंगामात पहिल्यांदाच मैदानात उतरणाऱ्या गुजरात टायटन्सनं संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) खांद्यावर दिली आहे. आयपीएलला सुरुवात होण्यापूर्वी पांड्यासह गुजरात टायटन्सच्या चाहत्यांना मोठा दिलासा मिळालाय.

हार्दिक पांड्यानं फिटनेस टेस्ट पास करत टीम इंडियात कमबॅक करण्यासाठी सज्ज असल्याचे संकेत दिले आहेत. जर आयपीएलच्या हंगामात तो तंदुरुस्त राहिला आणि पूर्वीच्या रिदममध्ये पुन्हा दिसला तर भारतीय संघाच्या पुढच्या दौऱ्यावर तो भारतीय संघाचा निश्चितच भाग असेल.

न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, BCCI चा एक अधिकारी म्हणाली की, बंगळुरुच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत जी फिटनेस टेस्ट झाली ती दुखापतीतून सावरुन पुन्हा कमबॅक करत असणाऱ्या खेळाडूंसाठी होती. हार्दिक पांड्या हा महत्त्वपूर्ण खेळाडू असून तो देखील या प्रक्रियेचा एक भाग होता.

यो-यो टेस्टमध्ये हार्दिक पांड्याचा 17+ स्कोअर

फिटनेस टेस्टवेळी NCA मधील मेडिकल टीमने हार्दिक पांड्याला गोलंदाजीसाठी कोणताही दबाव टाकला नव्हता. पण त्याने अष्टपैलू या नात्याने गोलंदाजीही केली. हार्दिक पांड्याने जवळपास 135 किलोमीटर प्रति तास वेगाने चेंडू टाकत यो-यो टेस्टमध्ये 17+ स्कोअर केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray Angry Reaction: ‘’निवडणूक आयोगाची पत्रकारपरिषद पाहून, तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता...’’

Leopard Conflict : मानव-बिबट संघर्ष नियंत्रणासाठी चार तासांत ११.२५ कोटींचा निधी मंजूर!

माझ्या माघारी मुलाला कोण सांभाळेल... मराठी अभिनेत्रीने सांगितला घटस्फोटाचा काळ; म्हणाली, 'रात्रभर झोप... '

Ajit Pawar: "वोट चोरीचं खोटं नरेटीव्ह..."; विरोधकांना टोला अन् अजितदादांचा 'गो लोकल'चा मास्टरस्ट्रॉक! राजकारणात खळबळ

Ladki Bahin Yojana: मोठी बातमी! काही महिने लाडक्या बहिणींना मिळणारे पैसे थांबणार, जाणून घ्या कारण

SCROLL FOR NEXT