bio bubble  esakal
IPL

IPL 2022 : खेळाडूंसह फॅमिलीसाठी कडक नियमावली, 1 कोटी दंडाची तरतूद

सकाळ डिजिटल टीम

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 2022 च्या 15 व्या हंगामासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बायो-बबलची विशेष नियमावली तयार केलीये. खेळाडूंसह स्टाफ सदस्य आणि सामना अधिकाऱ्यांनाही बायोबबलच्या नियमाचे पालन करावे लागणार आहे. नियामाचे उल्लंघन करणाऱ्यावर कारवाई केली जाईल. यात बंदी पासून ते कोटी रुपये दंडात्मक शिक्षेची तरतूद करण्यात आलीये.

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाच्या संकटात स्पर्धा होत असताना प्रत्येकाने नियमावलीचे पालन करणे अनिवार्य आहे. बबलमधून बाहेर पडल्याचे निदर्शनास आल्यास खेळाडू, स्टाफ सदस्य किंवा सामना अधिकाऱ्याला 7 दिवस क्वारंटाइन व्हावे लागेल. हेल्थ अँण्ड सेफ्टी प्रोटोकॉलनुसार क्वारंटाइनमध्ये वाढ होऊ शकते. बायोबबलचे उल्लंघन करुन फ्रेंचायझीने एखाद्या खेळाडूला बाहेरील व्यक्तीला भेटण्याची परवानगी दिली तर ते फ्रँचायझीला चांगलेच महागात पडेल. या परिस्थितीत फ्रँचायझीला 1 कोटी दंड बीसीसीआयकडे भरावा लागेल.

बबल तोडल्यास काय शिक्षा होणार?

  • पहिल्यांदा चूक केल्यास- जर आयपीएलच्या दरम्यान एखाद्या खेळाडूने, स्टाफ सदस्याने किंवा सामना अधिकारी बायोबबलमधून बाहेर पडला तर त्याला सात दिवसांचा क्वारंटाइन कालावधी अनिवार्य असेल. या काळात जेवढ्या सामन्याला मुकावे लागेल त्याचा एक पैसाही संबंधिताला मिळणार नाही.

  • दुसऱ्यांदा बायोबबल नियम मोडल्यास - दुसऱ्यांदा तिच चुक केली तर एका मॅचची बंदी आणि 7 दिवस क्वारंटाइन रहावे लागेल. काळात जेवढ्या सामन्याला मुकावे लागेल त्याचा एक पैसाही संबंधिताला मिळणार नाही.

  • तिसऱ्यांदा चूक चांगलीच महागात पडेल- एखाद्याने तिसऱ्यांदा हीच चूक केली तर त्याला संघातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात येईल. एवढेच नाही तर त्या संघाला रिप्लेसमेंटही मिळणार नाही.

खेळाडूंच्या कुटुंबियांसाठीही नियमावली

  • पहिली चूक - कुटुंबियातील एखाद्या सदस्याने बायबोबलच्या नियमावलीचे उल्लंघन केले तर त्या व्यक्तीशिवाय संबंधित खेळाडूला 7 दिवस क्वारंटाइन रहावे लागेल. यापरिस्थितीत देखील खेळाडू, स्टाफ सदस्य किंवा सामनाधिकारी आपल्या मानधनास मुकेल.

  • दुसरी चूक - कुटुंबियातील सदस्याने जर दुसऱ्यांदा ही चूक केली तर त्याला बायोबबलमधून बाहेर काढण्यात येईल. संबंधित खेळाडूला 7 दिवस क्वारंटाईन व्हावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

चंद्रपूर मनपामध्ये अविश्वासाचे ढग, भाजपातील अंतर्गत वाद चिघळणार; संख्याबळाचे समीकरण गुंतागुंतीचे

महसूल विभागाचा नवा आकृतिबंध मंजूर; राज्यात ३५ हजार ८७६ पदांची भर, चंद्रशेखर बावनकुळेंनी दिली माहिती

सावकारने किडनी विकलेल्या चंद्रपुरातील शेतकऱ्याची इच्छामरणाची मागणी, न्यायासाठी रोशन कुडेंची पायपीट सुरूच...

Lamangaon-Takli leopard scare: लामणगाव-टाकळी परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार; ग्रामस्थ भयभीत, वनविभागावर निष्क्रियतेचा आरोप

SCROLL FOR NEXT