IPL 2022 KKR vs PBKS Live Update Score Highlights
IPL 2022 KKR vs PBKS Live Update Score Highlights  ESAKAL
IPL

VIDEO | KKR vs PBKS : रसेलची मसल पॉवर; पाहा Highlights

अनिरुद्ध संकपाळ

मुंबई : आंद्रे रसेलच्या तुफान फटकेबाजीमुळे केकेआरने पंजाब किंग्जचे 137 धावांचे आव्हान 14.3 षटकात पार करत सामना खिशात टाकला. केकेआरची अवस्था एकेवेळी 4 बाद 51 अशी होती मात्र आंद्रे रसेल (31 चेंडूत 70 धावा) आणि सॅम बिलिंग्जने (23 चेंडूत 24 धावा) पाचव्या विकेटसाठी 90 धावांची भागीदारी रचत केकेआरचा विजय खेचून आणला.

पाहा आंद्रे रसेलने आपली मसल पॉवर दाखवत पंजाबच्या गोलंदाजांना कसे लोळवले.

आंद्रे रसेलची तुफान फटकेबाजी 31 चेंडूत 70 धावा चोपून केकेआरला 15 व्या षटकातच मिळवून दिला विजय

12 /109 : रसेल बिलिंग्जने डाव सावरला

51-4 : राहुल चाहरचा डबल धमाका

राहुल चाहरने पॉवर प्ले संपल्यानंतरच्या सातव्या षटकात श्रेयस अय्यर (26) नितीश राणा (०) यांना बाद करत केकेआरची अवस्था बिकट केली.

38-2 : व्यंकटेश अय्यर 3 धावा करून माघारी

14-1 : अजिंक्य रहाणे पुन्हा अपयशी 11 चेंडूत 12 धावा करून झाला बाद

137-10 : रसेलने संपवला पंजाबचा डाव

अखेर आंद्रे रसेलने खिंड लढवणाऱ्या कसिगो रबाडाला 25 धावांवर बाद करत पंजाबचा डाव 137 धावात संपवला.

कसिगो रबाडाने खिंड लढवत केल्या महत्वपूर्ण धावा

पंजाबच्या 102 धावांवर 8 विकेट गेल्यानंतर कसिगो रबाडा आणि ओडेन स्मिथ यांनी 9 व्या विकेटसाठी भागीदारी रचली. या दोघांच्या भागिदारीमुळे पंजाबने 130 धावांचा टप्पा पार केला.

102-8 : उमेश यादवचा भेदक मारा; पंजाबची अवस्था बिकट

केकेआरचा वेगवान गोलंदाज उमेश यादवने आपला चांगला फॉर्म याही सामन्यात दाखवून दिला. त्याने मयांकबरोबरच लिम लिव्हिंस्टोन, हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांना बाद केले. त्याने 23 धावात 4 बळी टिपले.

62-3 : साऊदीने दिला पंजाबला मोठा धक्का; शिखर धवन 16 धावा करून बाद

43-2 : 9 चेंडूत 31 धावा चोपणारा भानुका राजपक्षेला शिवम मावीने केले बाद

2-1 : पंजाबला मोठा धक्का; कर्णधार मयांक अग्रवाल बाद

उमेश यादवने नवीन चेंडूवर पुन्हा एकदा कमाल करत पंजाब किंग्जचा कर्णधार मयांक अग्रवालला एका धावेवर बाद केले. त्याने पहिल्याच षटकात पंजाबला मोठा धक्का दिला.

केकेआरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला.

कोलकाता आणि पंजाबने आपल्या संघात एक एक बदल केले आहे. कोलकाताने शिवम मावीला तर पंजाबने कसिगो रबाडाला संघात स्थान दिले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजार किरकोळ वाढीसह बंद; पॉवर शेअर्स बनले 'सुपरस्टार'

IPL 2024: केकेआरचा स्टार खेळाडू आता बॉलिवूडमध्ये करणार एन्ट्री; स्मृती मानधनाच्या बॉयफ्रेंडनं दिली संधी

Crime News : बुलढाणा जिल्ह्यात एकाच दिवशी 22 डीजे वर कारवाई; 6 लाख 32 हजार दंड, व गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

SCROLL FOR NEXT