IPL 2022 Kolkata Knight Riders vs Delhi Capitals  Sakal
IPL

KKR vs DC : कुलदीपचा 'चौकार'; पाहा Highlights

सकाळ डिजिटल टीम

143-8 उमेश यादवच्या पदरी भोपळा

कुलदीपनं उमेशला खातेही उघडू दिले नाही, त्याचे सामन्यातील चौथे यश

143-7 : विकेट मागून विकेट, कुलदीपच्या गोलंदाजीवर कोलकाताच्या फिरकीपटू फसला

सुनील नरेन पॉवेलच्या हाती झेल देऊन माघारी

139-6 : पॅट कमिन्स कुलदीपच्या फिरकीत अडकला

कुलदीप यादवच्या गोलंदाजीवर पॅट कमिन्स पायचित. त्याने 4 धावा केल्या.

133-5 : कोलकाताचा अर्धा संघ तंबूत

सॅम बिलिंग्सच्या रुपात खलील अहमदच्या खात्यात तिसरी विकेट, त्याने 15 धावांची भर घातली

117-4 : अर्धशतकानंतर श्रेयस अय्यरही तंबूत

कुलदीप यादवने कोलकाताच्या कर्णधाराच्या खेळीला लावला ब्रेक, अय्यरने 5 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने 33 चेंडूत कुटल्या 54 धावा

107-3 : नितीश राणा आणि श्रेयस अय्यर जोडी फुटली

ललित यादवनं कोलकाताची सेट होत असलेली जोडी फोडली, नितीश राणा 20 चेंडूत 3 षटकाराच्या मदतीने 30 धावा करुन तंबूत

38-2 : अजिंक्य रहाणेही स्वस्तात तंबूत

खलील अहमदचा भेदक मारा, अंजिक्यच्या रुपात खात्यात जमा केली दुसरी विकेट, रहाणेनं अवघ्या 8 धावांची भर घातली

21-1 : डोंगराऐवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना कोलकाताची खराब सुरुवात

खलील अहमदने सलामीवीर व्यंकटेश अय्यरला 18 धावांवर दाखवला तंबूचा रस्ता

अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूर-अक्षर पटेलची फटेबाजी

अखेरच्या षटकात शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे दिल्ली कॅपिटल्स संघाने निर्धारित 20 षटकात काढल्या 215 धावा

166-5 : वॉर्नर झेलबाद, दिल्लीचा अर्धा संघ तंबूत

तडाखेबाज फटकेबाजी करणाऱ्या वॉर्नरच्या खेळीला उमेश यादवने लावाला ब्रेक, त्याने 45 चेंडूत 6 चौकार आणि 2 चौकाराच्या मदतीने केल्या 61 धावा

161-4 : दिल्लीने गमावली आणखी एक विकेट

मोठी फटकेबाजी करण्याच्या नादात रोवमन पॉवेल अडकला सुनील नारायणच्या जाळ्यात

151-3 : दिल्लीला तिसरा धक्का  

ललित यादव अवघी एक धावा काढून तंबूत, सुनील नरेनने दिल्ली कॅपिटल्सला तिसरा धक्का देत पहिले यश मिळवले. त्याने ललित यादवला पायचित केले

148-2 : पंतच्या रुपात दिल्ली कॅपिटल्सला दुसरा धक्का

पंतने आक्रमक फटकेबाजी करत 14 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकाराच्या मदतीने केल्या 27 धावा

93-1 : अर्धशतकी खेळी करुन पंत माघारी.  

पृथ्वीला फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याने केलं बोल्ड, त्याने 29 चेंडूत 7 चौकार आणि 2 षटकारांसह 51 धावांची खेळी केली

पृथ्वीची अर्धशतकाला गवसणी

27 चेंडूत 2 चौकार आणि दोन षटकाराच्या मदतीने साजरे केले अर्धशतक

दिल्लीच्या सलामी जोडीची अर्धशतकी भागीदारी

पृथ्वी शॉ आणि डेव्हिड वॉर्नर या जोडीनं संघाला दमदार सुरुवात करुन दिलीये. दोघही आक्रम अंदाजात खेळत असून दोघांनी अर्धशतकी भागीदारी पूर्ण केलीये

वॉर्नर-पृथ्वीकडून दिल्लीच्या डावाची दमदार सुरुवात

पृथ्वी शॉ आणि डेविड वॉर्नर यांनी आक्रमक पवित्र्यात संघाच्या डावाला सुरुवात केलीये. ही जोडी लवकरात लवकर फो़ण्याचे मोठे आव्हान कोलकाताच्या गोलंदाजांसमोर आहे.

श्रेयस अय्यरनं टॉस जिंकला

कोलकाता संघाचा कर्णधार श्रेयस अय्यरनं नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.

मुंबईतील ब्रेबॉर्नच्या स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात सामना रंगला आहे. कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरनं टॉस जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला .डेव्हिड वॉर्नर आणि पृथ्वी शॉच्या अर्धशतकी खेळीनंत अखेरच्या टप्प्यात शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्सने ब्रेबॉर्नची लढाई 200 पारची केलीये. दिल्ली कॅपिटल्सने निर्धारित 20 षटकात 5 बाद 215 धावा करत कोलकाता नाईट रायडर्ससमोर 216 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा संघ 171धावांत आटोपला. कर्णधार श्रेयस अय्यर वगळता अन्य कोणत्याही फलंदाजाला मैदानात तग धरता आला नाही. त्यामुळे संघाला पराभवाचा सामना करावा लागला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SIR प्रक्रियेच्या १२ राज्यांच्या यादीत महाराष्ट्राचे नाव का नाही? निवडणूक आयोगाने थेट उत्तरच दिले!

Harman Investment Pune : पुण्यात होणार तब्बल ३४५ कोटींची गुंतवणूक; ऑटोमोटिव्ह इलेक्ट्रॉनिक्समध्ये मिळणार नोकऱ्या

New Year Horoscope Prediction : कोण होणार मालामाल आणि कुणाचं होणार नुकसान ? जाणून घ्या राशीनुसार नव्या वर्षाचं राशीभविष्य

Why is SIR Important: भारतात एसआयआर महत्त्वाचे का आहे? निवडणूक आयोगाने चार मोठी कारणे सांगितली!

Mokhada News : सकाळ बातमीचा परिणाम! नुकसानीची पाहणी करण्यासाठी कृषी अधिकारी शेतात.

SCROLL FOR NEXT