IPL 2022 Kolkata Knight Riders vs Rajasthan Royals  esakal
IPL

KKR vs RR : सलग पाच पराभवानंतर अखेर केकेआर जिंकली

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : अखेर कोलकाता नाईट रायडर्सने आपली पाच पराभवांची मालिका खंडित करत विजयाची चव चाखली. केकेआरने राजस्थानचे 153 धावांचे आव्हान 19.1 षटकात 3 फलंदाजाच्या मोबदल्यात पार केले. केकेआरकडून नितीश राणाने नाबाद 48 तर रिंकू सिंहने नाबाद 42 धावांची खेळी केली. कर्णधार श्रेयस अय्यरने देखील 34 धावांचे योगदान दिले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या राजस्थानने कर्णधार संजू सॅमसनच्या 54 धावांच्या जोरावर 152 धावा केल्या होत्या.

पाहा हायलाईट्स

नितीश राणा - रिंकू सिंहने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. 

नितीश राणा आणि रिंकू सिंहने चौथ्या विकेटसाठी नाबाद अर्धशतकी भागीदारी रचली. या दोघांनी सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. अखेर 6 चेंडूत विजयासाठी 1 धावेची गरज असताना

92-3 : अय्यर-राणाने रचलेली भागीदारी, बोल्टने तोडली 

श्रेयस अय्यर आणि नितीश राणा यांनी तिसऱ्या विकेटसाठी 60 धावांची भागीदारी रचली. मात्र ही भागीदारी बोल्टने संपवली. त्याने कर्णधार श्रेयस अय्यरला 34 धावांवर बाद केले.

32-2 : पॉवर प्लेमध्ये केकेआरला दुसरा धक्का

प्रसिद्ध कृष्णाने केकेआरला पॉवर प्लेमध्ये दुसरा धक्का दिला. त्याने बाबा इंद्रजीतला 15 धावांवर बाद केले.

16-1 : कुलदीप सेनने केकेआरला दिला पहिला धक्का

कुलदीप सेनने केकेआरचा सलामीवीर फिंचला 4 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला.

 हेटमायरची आक्रमक फलंदाजी 

हेटमायरने स्लॉग ओव्हरमध्ये चांगली हाणामारी करत 13 चेंडूत 27 धावा चोपल्या. त्याच्या या खेळीमुळे राजस्थानने 20 षटकात 5 बाद 152 धावांपर्यंत मजल मराली.

115-5 : राजस्थानला मोठा धक्का

राजस्थानला स्लॉग ओव्हरमध्ये पाठोपाठ दोन धक्के बसले. 17 व्या षटकाच्या अखेरच्या चेंडूवर रियान पराग बाद झाला. त्यानंतर 49 चेंडूत 54 धावांची झुंजार अर्धशतकी खेळी करणारा संजू सॅमसनला शिवम मावीने बाद केले.

115-4 : राजस्थानला चौथा धक्का

टीम साऊदीने राजस्थानला चौथा धक्का दिला. त्याने रियान परागला 19 धावांवर बाद केले.

कर्णधार संजू सॅमसनचे झुंजार अर्धशतक; राजस्थानने केली शंभरी पार

दुसऱ्या बाजूने ठराविक अंतराना विकेट पडत असताना कर्णधार संजू सॅमसनने झुंजार अर्धशतकी खेळी करत राजस्थानला शंभरी पार करून दिली.

90-3 : करूण नायरकडून निराशा

डॅलेर मिचेलच्या जागी संधी मिळालेल्या करूण नायरने निराशा केली. तो 13 चेंडूत 13 धावा करून बाद झाला. त्याला अनुकूल रायने बाद केले.

55-2 : बटलरने संजूची साथ सोडली.

राजस्थानची पहिली विकेट लवकर बाद झाल्यानंतर जॉस बटलर आणि संजू सॅमसन यांनी राजस्थानचा डाव सावरत दुसऱ्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी रचली. मात्र ही जोडी टीम साऊदीने फोडली. त्याने जॉस बटलरला 22 धावांवर बाद केले.

7-1 : राजस्थानला पहिला धक्का

उमेश यादवने देवदत्त पडिक्कलला अवघ्या 2 धावांवर बाद करत राजस्थानला पहिला धक्का दिला.

केकेआरचा गोलंदाजीचा निर्णय 

कोलकाता नाईट रायडर्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही संघ सामन्यासाठी सज्ज होताना 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

B.Arch Admission Round 3 : बी. आर्किटेक्चर प्रवेश प्रक्रियेची तिसरी यादी जाहीर; ७५८ विद्यार्थ्यांना नवी संधी, ५३६ जणांचे ऑटो फ्रिज प्रवेश निश्चित

विदर्भासह मध्य भारतात पावसाचा अलर्ट; अतिमुसळधार पावसाचा इशारा

Sakal Impact | MPSC Drug Inspector Exam Scam: एमपीएससी औषध निरीक्षक भरतीत पेपरफुटीला दुजोरा; संपूर्ण प्रक्रिया रद्द, शुल्काविना फेरपरीक्षा जाहीर

SCROLL FOR NEXT