IPL

IPL 2022 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या आगमनाने चुरस वाढणार

नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये उद्या दिल्ली कॅपिटल्स- लखनौ सुपर जायंटस्‌ या दोन संघांमध्ये लढत रंगणार

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये उद्या दिल्ली कॅपिटल्स- लखनौ सुपर जायंटस्‌ या दोन संघांमध्ये लढत रंगणार आहे. यावेळी डेव्हिड वॉर्नर दिल्ली कॅपिटल्ससाठी खेळण्यास सज्ज झाला असून ॲनरीक नॉर्किया यानेही फिटनेस परीक्षा पास केली आहे. तसेच लखनौ सुपर जायंटस्‌साठी मार्कस स्टोयनिस हा अष्टपैलू खेळाडू खेळण्याची शक्यता आहे. एकूणच आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंच्या आगमनानंतर आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची चुरस आणखीन वाढणार आहे.

रिषभ पंतच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सला दोन लढतींपैकी एकामध्ये विजय मिळाला असून एका लढतीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

सलामीच्या लढतीत पराभवानजीक जात असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला अक्षर पटेल व ललित यादव या जोडीने वाचवले. त्यानंतर गुजरात टायटन्सकडून त्यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला. मात्र वॉर्नरच्या पुनरागमनामुळे या संघाचा सलामीचा प्रश्‍न सुटणार आहे. पृथ्वी शॉ त्याच्यासोबत सलामीला खेळेल. पण वॉर्नरच्या आगमनानंतर टीम सेईफर्ट आणि रोवमन पॉवेल यांच्यापैकी एकाला बाहेर बसवण्यात येऊ शकते. तसेच पंत, मनदीप सिंग यांनाही फलंदाजीत चमक दाखवावी लागणार आहे. अक्षर, ललित व शार्दूल ठाकूर या अष्टपैलू खेळाडूंकडूनही दिल्ली कॅपिटल्सला मोठ्या आशा आहेत.

विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज

के. एल. राहुलच्या नेतृत्वात पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी झालेला लखनौ सुपर जायंटस्‌ हा संघ चमक दाखवत आहे. गुजरात टायटन्स संघाकडून हार सहन करावी लागल्यानंतर लखनौ सुपर जायंटस्‌ संघाने चेन्नई सुपरकिंग्ज व सनरायझर्स हैदराबाद या दोन संघांना पराभवाची धूळ चारली आहे. आता हा संघ विजयाच्या हॅट्ट्रिकसाठी सज्ज झाला आहे.

आयपीएल लढत

  • लखनौ सुपर जायंटस्‌ - दिल्ली कॅपिटल्स

  • डी. वाय. पाटील स्टेडियम, नवी मुंबई

  • रात्री ७.३० वाजता

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Army: देशसेवकाला अखेरचा सलाम! जवान तुषार भिलारेंच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; कुटुंबीयांचा आक्रोश काळजाला भिडणारा

Delhi Pollution Master Plan : दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना 'WFH' अनिवार्य, पार्किंग शुल्कातही दुप्पट वाढ; प्रदूषण नियंत्रणासाठी नवे धोरण लागू

Pune Highway Upgrade: घोडेगाव–मंचर–बेल्हे महामार्ग विकासाला ४७० कोटींचा मुबलक निधी; भीमाशंकर प्रवास २० किमीने कमी, भाविकांना मोठा दिलासा

Parbhani News: घरी परतताना काळाचा घाला! जिंतूरमध्ये पुराच्या पाण्यात वाहून गेलेल्या शेतकरी महिलेचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला

Nanded Accident: परभणीच्या कुटुंबावर काळाचा घाला! नांदेडमध्ये अपघातात कुटुंबप्रमुखाचा मृत्यू, पत्नी व दोन मुले गंभीर

SCROLL FOR NEXT