IPL 2022 BCCI announced schedule Pune hosts
IPL 2022 BCCI announced schedule Pune hosts Sakal
IPL

IPL 2022 : प्रेक्षकांच्या एन्ट्रीबाबत ठाकरे सरकार DRS घेणार?

सकाळ डिजिटल टीम

इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या 15 व्या हंगामाला 26 मार्च पासून सुरुवात होणार आहे. यंदा स्पर्धेतील ग्रुप स्टेजचे सामने महाराष्ट्रातील पुणे आणि मुंबईतील स्टेडियमवर रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. कोरोनाच्या संकटामुळे बंद झालेला आयपीएल स्टेडियमचा दरवाजा यावेळी उघडणार असल्याची चर्चाही रंगली होती. स्टेडियममधील प्रेक्षक क्षमतेच्या 25 टक्के सीट्स भरण्याची परवानगी राज्य सरकारकडून देण्यात आली होती. पण महाराष्ट्र राज्य सरकार प्रेक्षकांना स्टेडियममध्ये एन्ट्री देण्यासंदर्भात पुनर्विचार करत असल्याचे वृत्त समोर येत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील साखळी फेरीतील लढती या प्रेक्षकांशिवाय रंगण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केंद्र सरकारकडून राज्य सरकारला सतर्कतेच्या सूचना

केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारला नव्या कोविड -19 च्या व्हॅरिएंटसंदर्भात सतर्कतेचा इशारा दिलाय. याचा आयपीएलवर परिणाम होऊ शकतो. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, युरोपीय देशांसह दक्षिण कोरिया आणि चीनमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारला पत्राच्या माध्यमातून विशेष काळजी घेण्याची सूचना केली आहे, अशी माहिती त्यांनी दिली. मात्र याचा आयपीएल सामन्यांवर काय परिणाम होणार याबाबत त्यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही.

मुंबई आणि पुण्यात होणार आहेत साखळी फेरीतील लढती

आयपीएल 2022 च्या साखळी सामन्यात सर्व लढती या महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्याच्या स्टेडियमवर नियोजित आहेत. यासाठी बायोबबलचे वातावरणही तयार करण्यात आले आहे. दोन्ही शहरात मिळून एकूण 70 सामने होणार आहेत. आयपीएल गव्हर्निंग काउंसिल आणि महाराष्ट्र सरकारने या सामन्यासाठी प्रेक्षक क्षमतेच्या 25 टक्के लोकांना स्टेडियममध्ये प्रवेश देण्याची योजना आखली आहे. पण कोरोनाच्या संकटाचा धोका लक्षात घेता राज्यातील ठाकरे सरकार यासंदर्भात रिव्हू घेण्याची शक्यता निर्माण झालीये. ठाकरे सरकार खरंच रिव्ह्यू (DRS) घेणार का? आणि त्याचा निर्णय प्रेक्षक आणि फ्रेंचायझीच्या विरोधात लागणार की बाजूनं हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monsoon at Kerala: मॉन्सून प्रगतीपथावर, चोवीस तासात केरळमध्ये लावणार हजेरी; महाराष्ट्रात कधी येणार? जाणून घ्या

Latest Marathi News Live Update : उद्यापासून मध्य रेल्वेचा ६२ तासांचा मेगाब्लॉक; लांब पल्ल्याच्या अनेक गाड्या रद्द होणार

Ankush Gupta Research : मोबाईल लॅपटॉप अन् इलेक्ट्रिक कार.. १ मिनिटात चार्ज होणार ; भारतीय संशोधकाने बनवले 'हे' तंत्रज्ञान

Nashik Crime News : अल्पवयीन मुलीवर बलात्कार; आरोपींना 20 वर्षे सक्तमजुरी

Delhi High Temperature : आजवरचे सगळे रेकॉर्ड मोडले; दिल्लीत उन्हाचा पारा 52 डिग्रीच्याही वर

SCROLL FOR NEXT