IPL 2022 Mega Auction England batter Liam Livingstone sold to Punjab Kings  Sakal
IPL

IPL 2022 Auction : इंग्लिश मॅन ठरला महागडा फॉरेनर; पंजाबनं लावला मोठा डाव

सुशांत जाधव

IPL Auction 2022 : इंग्लंड बॅटर लायम लिविंगस्टोनसाठी (Liam Livingstone) पंजाब किंग्जनं मोठी रक्कम मोजली. सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब यांच्यात इंग्लिशमॅनला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. सरशेवटी पंजाबने 11.50 कोटीचा डाव लावूत खेळ जिंकला. मेगा लिलावाआधी पर्समध्ये मोठी शिल्लक राखून ठेवलेल्या पंजाबने (to Punjab Kings) दुसऱ्या दिवशीसाठीही इतर फ्रँचायझीच्या तुलनेत मोठी शिल्लक ठेवली. याचा फायदा त्यांना दुसऱ्या दिवशीच्या खरेदीवेळी होताना दिसतोय.

. 2 कोटींच्या घरातील लायम लिविंगस्टोन यापूर्वी सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना दिसला आहे. आता तो पंजाबकडून खेळेल. आतापर्यंतच्या लिलावातील तो सर्वात महागडा परदेशी खेळाडू आहे. त्याच्यापाठोपाठ निकोलस पूरन आणि श्रीलंकेच्या हसरंगाचा नंबर लागतो. पूरनसाठी हैदराबाद संघाने तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हसरंगासाठी 10 कोटी 75 लाख मोजले आहेत. त्याच्याशिवाय पंजाबने कॅरेबियन ओडेन स्मिथसाठी 6 कोटी मोजले. पंजाबने दमदार खेळाडू आपल्या ताफ्यात घेऊन उत्तम संघ बांधणी केल्याचे दिसते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Wani News : सप्तशृंगगडावर आज रंगणार कोजागरीचा महासोहळा; कावड यात्रेसह तृतीयपंथीयांचा छबिना उत्सव

Aapli ST App : बस स्टँडवर एसटीची वाट बघत थांबताय? तुमचं टेन्शन मिटलं! ‘Aapli ST’ अ‍ॅपवर कळणार Live लोकेशन, पण कसं? पाहा एका क्लिकवर

थैलावाचा साधेपणा! रस्त्यावर केलं जेवण, कामातून घेतला आध्यात्मिक ब्रेक

Mud Volcano: अंदमानमधील चिखलाचा ज्वालामुखी सक्रिय; भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभाग पाठवणार संशोधन पथक

Ahilyanagar News:'अहिल्यानगर शहरात प्रेम विवाहातून प्राणघातक हल्ले वाढले'; जोडप्यांचा टोकाचा निर्णय..

SCROLL FOR NEXT