IPL 2022 mega auction Raj Bawa  Sakal
IPL

IPL 2022 Auction : राजा बावाची हवा; भावानं 20 लाखाचे काही क्षणात केले 2 कोटी

सुशांत जाधव

IPL 2022 mega auction Raj Bawa : अंडर 19 वर्ल्ड कप विजेत्या संघातील स्टार अष्टपैलू राज बावानं आयपीएलच्या मेगा लिलावात सर्व फ्रँचायझीच लक्ष वेधून घेतलं. 20 लाखाच्या 19 वर्षीय पोराला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्जमध्ये चुरच पाहायला मिळाली. सरशेवटी पंजाबने बाजी मारत 2 कोटीवर सौदा आपल्या बाजूनं केला.

अंडर-19 वर्ल्ड कप स्पर्धेतील अंतिम सामन्यात (ICC Under 19 World Cup 2022 Final) राज बावानं (Raj Bawa) नं इंग्लंडच्या फलंदाजांना गुडघे टेकायला भाग पाडले होते. फलंदाजीवेळी त्याने उपयुक्त 35 धावा करत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता.

अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत साखळी सामन्यात त्याने युगांडा विरुद्ध 108 चेंडूत 162 धावांची नाबाद खेळी केली होती. ही अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या ठरली होती. या विक्रमी धावसंख्येसह त्याने शिखर धवनचा (Shikhar Dhawan) विक्रम मोडीत काढला होता. धवनने 2004 च्या अंडर 19 वर्ल्ड कप स्पर्धेत 155 धावांची सर्वोच्च खेळी केली होती. आता राज बावा शिखर धवनसोबत खेळताना दिसेल.

राज बावाला खेळाचा वारसा लाभला आहे. त्याचे आजोबा हॉकीपटू आणि ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट आहेत. वडीलांनी युवराज सिंग सिंहसह दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेटर्संना प्रशिक्षण दिले आहे. राज बावाचे वडील सुखविंदर बावा (Sukhwinder Bawa) हरियाणा ज्यूनियअर हॉकी संघाचे सदस्य राहिले आहेत. 1988 मध्ये अंडर-19 क्रिकेट कॅम्पमध्येही त्यांचे सिलेक्शन झाले होते. पण दुखापतीमुळे त्यांना संघाला जॉईन होता आले नाही. पुढे ते 22 व्या वर्षीच कोचिंगच्या दिशेनं वळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajya Sabha Election : 'ऑपरेशन कमळ'ची भीती की क्रॉस व्होटिंगचं संकट? राज्यसभा निवडणुकीसाठी काँग्रेसचा मोठा गेम प्लॅन; चार्टर्ड विमानाने 63 आमदारांना हलवले

Parbhani: मृग नक्षत्रावर बळिराजाच्या आशा;खरीप हंगामाच्या तोंडावर कृषी विभागाने दिला ‘हा’ मोलाचा सल्ला

Navi Mumbai News: डेटा सेंटरमुळे संकट? नवी मुंबईत विरोध, माजी उपमहापौर आक्रमक

IND vs AFG: हार्दिक पांड्याच्या जागी टीम इंडियात कोणाला जागा मिळणार? मुंबईचा ऑल राऊंडर दोन वर्षानंतर संघात परतणार...

Kolhapur Jaggery Market : कोल्हापुरात ‘अन्न औषध’ विभाग सतर्क; कारवाईच्या भितीने गूळ उत्पादन बंद, मार्केटमध्ये गुळाची आवक घटली

SCROLL FOR NEXT