IPL 2022 Auction: पंजाबचा राखून ठेवलेला 'हच्चा' आला कामी

Punjab Kings only 2 player Retention Strategy works in IPL 2022 Mega Auction
Punjab Kings only 2 player Retention Strategy works in IPL 2022 Mega Auctionesakal

बंगळुरू : आयपीएल लिलावाच्या (IPL 2022 Auction) दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात अनेक फ्रेंचायजींनी आपला संघ पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामध्ये सर्वात आघाडीवर होते ते पंजाब किंग्ज. (Punjab Kings) पंजाबने रिटेंशनपासूनच आपल्याकडे (Punjab Kings Retention Strategy) मेगा लिलावासाठी पुरेसा पैसा असावा अशी खेळी केली. त्यांनी फक्त दोन खेळाडू रिटेन करून आपल्या खात्यात सर्वात जास्त रक्कम राखून ठवली.

पंजाब किंग्जने मयांक अग्रवालला (Mayank Agarwal) 14 कोटी तर अर्शदीप सिंगला 4 कोटी देऊन रिटेन केले. त्यामुळे त्यांच्याकडे 90 कोटी रूपयांमधील तब्बल 72 कोटी रूपये शिल्लक राहिले. पंजाब किंग्जने केएल राहुल, मोहम्मद शामी आणि ख्रिस गेल सारख्या खेळाडूंना रिलीज करून मोठी रिस्क घेतली होती.(Punjab Kings only 2 player Retention Strategy works in IPL 2022 Mega Auction)

Punjab Kings only 2 player Retention Strategy works in IPL 2022 Mega Auction
IPL 2022 Auction : इंग्लिश मॅन ठरला महागडा फॉरेनर; पंजाबनं लावला मोठा डाव

मात्र मेगा लिलावात (IPL Mega Auction 2022) उतरणाऱ्या कोणत्याही संघाकडे पंजाबएवढी रक्कम नव्हती. याचा पंजाबला लिम लिव्हिंगस्टोन (Liam Livingstone), शाहरूख खान, शिखर धवन, कसिगो रबाडा, जॉनी बेअरस्टो आणि ओडेन स्मिथ यासारखे खेळाडू आपल्या गोटात खेचण्यात फायदा झाला. जरी पंजाबकडे चांगला पैसा असला तरी त्यांनी एकाच खेळाडूवर दौलतजादा होणार नाही याची काळजी घेतली. त्यांनी आतापर्यंत लिलावात फक्त एका खेळाडूसाठी 10 कोटीची वरची बोली लावली.

पंजाब किंग्जकडे मयांक अग्रवाल (14 कोटी ) आणि लिम लिव्हिंगस्टोन (11.50 कोटी ) हेच दोन 10 कोटी रूपयांच्या वरची बोली लागलेले खेळाडू आहेत. खिशर धवन (8.25 कोटी) आणि कसिगो रबाडासाठी (9.25 कोटी) चांगली किंमत मोजली पण, ते बजेटच्या बाहेर गेले नाहीत.

Punjab Kings only 2 player Retention Strategy works in IPL 2022 Mega Auction
Hey काव्या Please गो फॉर रैना! चाहत्याचं SRH मालकीणीसमोर साकडं

पंजाबच्या आतापर्यंतच्या संघावर नजर टाकली तर त्यांच्याकडे शिखर धवन (Shikhar Dhawan), मयांक अग्रवाल, जॉनी बेअरस्टो यासारखी तडगी टॉप ऑर्डर आहे. तर शाहरूख खान (Shahrukh Khan), लिव्हिंगस्टोन, ओडेन स्मिथ यासारखी अष्टपैलू आणि हार्ड हिटरची चांगली फळी आहे. याचबरोबर वेगवान गोलंदाजी विभागात अर्शदीप सिंग, कसिंगो रबाडा (Kagiso Rabada), संदीप शर्मा यांचा समावेश आहे. त्याच्या जोडीला लिव्हिंगस्टोनही आहे. फिरकी विभागात त्यांची मुख्य मदार ही राहुल चहरवर असेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com