IPL

...तर टायटॅनिक जहाजही बुडाले नसते; कैफचे तेवतियासाठी हटके ट्विट

राहुल तेवतियाने शेवटच्या दोन चेंडूत 2 षटकार ठोकत गुजरातला शानदार विजय मिळवून दिला.

Kiran Mahanavar

IPL 2022 GT vs PBKS : राहुल तेवतियाने शेवटच्या दोन चेंडूत 2 षटकार ठोकत गुजरातला शानदार विजय मिळवून दिला. त्यामुळे सगळीकडून तेवतियाचे खूप कौतुक होत आहे. तेवतियाने शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारत पंजाबच्या तोंडून विजय हिसकावून घेतला. मात्र ९६ धावांच्या खेळीसाठी शुभमन गिलला सामनावीराचा किताब देण्यात आला. पण तेवतियाने या सामन्यात खरी मजा आणली. तेवतियाची धमाकेदार खेळी पाहून मोहम्मद कैफने एक ट्विट केले आहे जे खूप व्हायरल होत आहे.

कैफने आपल्या ट्विटमध्ये तेवतियाची इनिंगची तुलना टायटॅनिक जहाजाशी केली आहे. कैफने आपल्या ट्विटमध्ये लिहिले की टायटन्सला विसरा, जर तेवतिया टायटॅनिकवर असता तर ते बुडले नसते. टायटॅनिक हे असेच एक जहाज होते, ज्याला 'द अनसिंकेबल' असे नाव देण्यात आले होते, परंतु 10 एप्रिल 1912 रोजी टायटॅनिक समुद्रात बुडाले होते. तसेच काहीसे या सामन्यात गुजरातचा संघ जवळपास पराभवाच्या उंबरठ्यावर होता, मात्र तेवतियाने शेवटच्या दोन चेंडूंवर दोन षटकार मारत सामना जिंकला.

शुभमन गिलने शानदार 96 धावांची खेळी केली पण राहुल तेवतियाने शेवटच्या दोन चेंडूत षटकार खेचून गुजरात टायटन्सला इंडियन प्रीमियर लीगमध्ये पंजाब किंग्जवर सहा गडी राखून रोमहर्षक विजय मिळवून दिला. गुजरातला शेवटच्या षटकात 19 धावांची गरज होती. हार्दिक पंड्या (18 चेंडूत 27) धावबाद झाला आणि संघाला शेवटच्या दोन चेंडूत 12 धावांची गरज होती.

तेवतियाने ओडिअन स्मिथला डीप मिडविकेट आणि लाँग ऑनवर षटकार ठोकल्याने गुजरातने सलग तिसरा विजय मिळून दिला. गिलने ५९ चेंडूंत ११ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ९६ धावा केल्या. त्याने साई सुदर्शन सोबत दुसऱ्या विकेटसाठी 101 धावांची भागीदारी केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT