IPL 2022 | MS Dhoni Update sakal
IPL

IPL 2022: भारताच्या दिग्गज खेळाडूचा सल्ला, धोनी सलामीला आला तर...

ना फलंदाज गतविजेत्याप्रमाणे खेळत आहे ना गोलंदाजीत ती धार दिसत आहे अशा स्थितीत...

Kiran Mahanavar

IPL 2022 : आयपीएलच्या इतिहासात चेन्नई सुपर किंग्जची अवस्था सध्याच्या हंगामाइतकी वाईट कधीच झालेली नव्हती. चार वेळची चॅम्पियन सीएसकेने सलग पहिले चार सामने हारले आहेत. ना फलंदाज गतविजेत्याप्रमाणे खेळत आहे. ना गोलंदाजीत ती धार दिसत आहे. अशा स्थितीत चेन्नई सुपर किंग्जला काही नवे प्रयोग करताना बघायला नक्कीच आवडेल. अशी कल्पना पार्थिव पटेलनी मांडली आहे.(IPL 2022 MS Dhoni Update)

चेन्नई सुपर किंग्जचा माजी स्टार यष्टीरक्षक फलंदाज पार्थिववर विश्वास ठेवायचा असेल तर महेंद्रसिंग धोनीने सलामी दिली पाहिजे. क्रिकबज बरोबर बोलतं असताना पटेल म्हणाला, चेन्नईचा माजी कर्णधार धोनीने डावाची सुरुवात करायला हवी. जर तो 14-15 षटके मैदानात खेळत राहिला तर तुम्हाला स्कोअरबोर्डमध्ये फरक दिसेल. धोनी असा खेळाडू आहे ज्याने CSK ला वर्षानुवर्षे जिवंत ठेवले आहे.

महेंद्रसिंग धोनीने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीला सलामीवीर म्हणून सुरुवात केली होती. कारकिर्दीच्या शेवटी ही भूमिका घ्यायला हवी. तो सध्या 7व्या क्रमांकावर फलंदाजी करतो. मग धोनी नंबर 3 किंवा ओपनिंगवर उतरायला काही हरकत नाही. माहीने चेन्नई सुपर किंग्जसाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना सात डावात एक अर्धशतकासह 188 धावा केल्या आहेत. धोनी 2011 मध्ये तीन क्रमांकावर शेवटची फलंदाजी करताना दिसला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KDMC: अतिधोकादायक इमारतींच्या पुनर्विकासासाठी ठोस धोरण ठरवा, ठाकरे गटाची मागणी

स्टार प्रवाहने केली एक दोन नाही तब्बल ६ नव्या मालिकांची घोषणा; २ कार्यक्रमही सोबतीला, ही आहेत नाव आणि कलाकार

Kalyan: इंधन दरवाढीच्या निषेधार्थ काँग्रेसचे अनोखे आंदोलन; घोड्यावरून मोर्चा काढत नागरिकांना मेलोडीचे वाटप

Latest Marathi News Live Update : पुण्यातील विषारी दारु प्रकरणाचा तपास सीआयडीकडे जाण्याची शक्यता

US-Iran Ceasefire Deal: 'होर्मुज'मध्ये शांतता आणि इराणसाठी 300 अब्ज डॉलरची गुंतवणूक; अमेरिका-इराणमध्ये शांतता कराराचा नवीन मसुदा

SCROLL FOR NEXT