IPL 2022 Punjab Kings vs Lucknow Super Giants esakal
IPL

PBKS vs LSG : लखनौ सुपर जायंटने पंजाबचा केला पराभव; पाहा Highlights

सकाळ डिजिटल टीम

लखनौने पंजाबचा केला पराभव (Highlights)

पुणे : लखनौ सुपर जायंटने पंजाब किंग्जचा 20 धावांनी पराभव करत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. लखनौ सुपर जांयटने पंजाब किंग्ज समोर 154 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र पंजाबला 133 धावांपर्यंतच मजल मारता आली. पंजाबकडून बेअरस्टोने सर्वाधिक 32 धावा केल्या. लखनौ सुपर जायंटकडून मोहसीन खानने 3 तर क्रुणाल पांड्या 2 दुष्मंथा चमीराने 2 विकेट घेतल्या. लखनौ सुपर जायंटकडून क्विंटन डिकॉकने सर्वाधिक 46 धावा केल्या.

103-6 : पंजाबची शेवटची आशा देखील मावळली

एका बाजूने सर्व फलंदाज फज्जाला पाय लावून परतत असताना जॉने बेअरस्टो कडवी झुंज देत होता. मात्र चमिराने त्याची ही 32 धावांची खेळी संपवली.

92-5 : क्रुणाल पांड्याने जितेश शर्माला केले बाद, पंजाबचा निम्मा संघ माघारी

88-4 : मोहसीन खानने पंजाबला दिला मोठा धक्का

आक्रमक शैलीचा फलंदाज लिम लिव्हिंगस्टोन जॉनी बेअरस्टोबरोबर भागीदारी रचत होता. ही भागीदारी 30 धावांपर्यंत पोहचली होती. मात्र मोहसीन खानने 16 चेंडूत 18 धावा करणाऱ्या लिव्हिंगस्टोनला बाद करत ही भागीदारी तोडली.

58-3 : पंजाबचाही खराब सुरूवात 

पंजाबला क्रुणाल पांड्याने तिसरा धक्का दिला. त्याने भानुका राजपक्षाला 9 धावांवर बाद केले.

46-2 : बिश्नोईने केली 'शिखर' शिकार 

पंजाबचा सलामीवीर शिखर धवन आज संथ फलंदाजी करत होता. अखेर ही 15 चेंडूत 5 धावांची खेळी रवी बिश्नोईने संपवली.

35-1 : मयांक अग्रवाल बाद 

दुष्मंता चमिराने पंजाब किंग्जला पहिला धक्का दिला. त्याने 25 धावा करणाऱ्या मयांक अग्रवालला बाद केले.

153-8 (20 Ov) : रबाडा - चहरने लखनौच्या फलंदाजांना रोखले.

कसिगो रबाडाने 4 तर राहुल चहरने 2 विकेट घेत लखनौच्या फलंदाजीला खिंडार पाडले. या दोघांच्या भेदक माऱ्यासमोर लखनौला 20 षटकात 8 बाद 153 धावांपर्यंतच मजल मराता आली.

111-6 : स्टॉयनिसकडून निराशा

लखनौची एका बाजूने पडझड होत असताना मार्कस स्टॉयनिस डाव सावरेल असे वाटत होते. मात्र राहुल चहरने त्याला अवघ्या 1 धावेवर बाद करत लखनौला चांगलेच अडचणीत आणले.

109-5 : रबाडाचा धडाका, लखनौचा निम्मा संघ माघारी 

कसिगो रबाडाने लखनौ सुपर जायंटच्या फलंदाजीला सुरूंग लावला. त्याने क्रुणाल पांड्याला 7 तर आयुष बदोनीला 4 धावांवर बाद केले.

104-3 : दीपक हुड्डा धावबाद

जॉनी बेअरस्टोने 28 चेंडूत 34 धावा करणाऱ्या दीपक हुड्डाला धावबाद करत तिसरा धक्का दिला.

98-2 : संदीप शर्माने जोडी फोडली

संदीप शर्माने 46 धावा करणाऱ्या क्विंटन डिकॉकला बाद करत लखनौला दुसरा धक्का दिला. त्याने हुड्डा - डिकॉकची 85 धावांची भागीदारी करणारी जोडी फोडली.

LSG 67-1 (10 Over) : हुड्डा-डिकॉकची भागीदारी

राहुल बाद झाल्यानंतर क्विंटन डिकॉक आणि दीपक हुड्डाने दुसऱ्या विकेटसाठी भागीदारी रचण्यास सुरूवात केली.

13-1 : रबाडाने दिला लखनौला मोठा धक्का

कसिगो रबाडाने लखनौ सुपर जायंटचा कर्णधार केएल राहुलला 6 धावांवर बाद करत पहिला धक्का दिला.

पंजाबने नाणेफेक जिंकली.

पंजाब किंग्जचा कर्णधार मयांक अग्रवालने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजाबने आपल्या सामन्यात कोणताही बदल केलेला नाही. तर लखनौने आपल्या संघात एक बदल केला आहे. मनिष पांडेच्या जागी आवेश खानला संघात स्थान देण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Retirement Plan : मोठी बातमी! अमित शहांनी सांगितला ‘रिटारयमेंट प्लॅन'

Thane News: संतापजनक! शाळेच्या टॉयलेटमध्ये रक्त दिसलं, मासिक पाळीच्या संशयातून मुलींना विवस्त्र केलं अन्...; ठाण्यातील प्रकारानं खळबळ

Bhoom Crime : भूममध्ये कत्तलीसाठी जाणारी १६ जणावरे पकडली, आठ लाखाचा मुद्देमाल जप्त

Lungs Health Tips: थोडं चाललं तरी धाप लागते? श्वास घेताना त्रास होतोय? जाणून घ्या तज्ज्ञांनी सांगितलेले ५ सोपे घरगुती उपाय!

Bike Accident : दोन दुचाकींची समोरासमोर धडक; १ जण ठार, तर ३ जण जखमी

SCROLL FOR NEXT