IPL 2022 Rajasthan Royals vs Delhi Capitals esakal
IPL

RR vs DC : मार्श आला फॉर्ममध्ये; महत्वाच्या सामन्यात दिल्लीचा विजय

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : मुंबई : दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) मिशेल मार्शच्या (Mitchell Marsh) 89 आणि डेव्हिड वॉर्नरच्या (David Warner) नाबाद 52 धावांच्या जोरावर राजस्थान रॉयल्सचे (Rajasthan Royals) 160 धावांचे आव्हान 18.1 षटकात पार केले. दिल्लीने मस्ट विन सामन्यात विजय मिळवत प्ले ऑफच्या आशा जीवंत ठेवल्या. राजस्थानकडून फक्त ट्रेंट बोल्ट आणि युझवेंद्र चहलला प्रत्येकी एक विकेट घेता आली. राजस्थानकडून बॅटिंगमध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या आर. अश्विनने अर्धशतकी खेळी केली. तर त्याला साथ देणाऱ्या देवदत्त पडिक्कलने देखील 48 धावांची झुंजार खेळी केली.

डेव्हिड वॉर्नरचे दमदार अर्धशतक ऋषभ पंतने दोन षटकार मारत सामना संपवला Highlights 

 अखेर चहलने राजस्थानला दिला दिलासा

अखेर युझवेंद्र चहलने दिल्लीच्या 62 चेंडूत 89 धावा करणाऱ्या मिशेल मार्शला बाद करत दिलासा दिला. त्याने डेव्हिड वॉर्नर आणि मिशेल मार्श यांची 144 धावांची भागीदारी संपवली.

मिशेल मार्शचे दमदार अर्धशतक

मिशेल मार्शने दमदार अर्धशतक ठोकत आपला ऑस्ट्रेलियन पार्टनर डेव्हिड वॉर्नरबरोबर दुसऱ्या विकेटसाठी नाबाद शतकी भागीदारी रचली.

0-1 : बोल्टने दिला दिल्लाला पहिला धक्का

राजस्थान रॉयल्सने विजयासाठी ठेवलेले 160 धावांचे आव्हान पार करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लाला ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटकात धक्का दिला. त्याने श्रीकार भारतला शुन्यावर बाद केले.

160-6 (20 Ov) : दिल्लीसमोर 160 धावांचे आव्हान 

146-6 : पडिक्कलचे अर्धशतक हुकले.

नॉर्त्जेने देवदत्त पडिक्कला 48 धावांवर बाद केले. त्यामुळे पडिक्कलचे अर्धशतक हुकले.

142-5 :संजू रियानकडून निराशा 

107-3 : अर्धशतकानंतर अश्विन माघारी

तिसऱ्या क्रमांकावर बढती मिळालेल्या आर. अश्विनने तिसऱ्या विकेटसाठी देवदत्त पडिक्कल सोबत 53 धावांची भागीदारी रचली. मात्र 38 चेंडूत 50 धावा करून आर. अश्विन बाद झाला.

54-2 : यशस्वी जैसवाल बाद

मिशेल मार्शने 19 चेंडूत 19 धावा करणाऱ्या राजस्थानचा सलामीवीर यशस्वी जैसवालला बाद करत दुसरा धक्का दिला.

11-1 : राजस्थानला पहिला धक्का

चेतन साकरियाने राजस्थानला मोठा धक्का दिला. त्याने जॉस बटलरला 7 धावांवर बाद करत दिल्लीला पहिले यश मिळवून दिले.

दिल्लीच्या संघात दोन बदल

दिल्लीने आजच्या सामन्यासाठी दोन बदल केले आहेत. रिपल पटेलच्या जागी ललित यादव आणि खलील अहमदच्या जागी चेनत साकरिया यांना संधी देण्यात आली आहे. तर राजस्थानने आपल्या संघात एक बदल केला आहे. हेटमायरच्या अनुपस्थितीत रॅसी वॅन डेर ड्युसेन त्याची जागा घेईल.

दिल्लीने नाणेफेक जिंकली

दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

History! फुटबॉल खेळणाऱ्या देशाचे क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये पदार्पण; इटलीचा संघ T20 World Cup 2026 स्पर्धेसाठी पात्र ठरला

IND vs ENG 3rd Test: शुभमन गिलने मोडला 'विराट' विक्रम! लोकेश राहुलच्या फिफ्टीने लढवला किल्ला, रिषभ पंत दुखापतीतून सावरला

IND vs ENG 3rd Test: OUT or NOT OUT? जो रूटने अफलातून झेल, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड; राहुल द्रविडचा विक्रम मोडला, पण रंगलाय वाद

World Heritage status: अभिमानाची बाब! शिवरायांच्या १२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या यादीत समावेश

Shambhuraj Desai : संजय राऊतांच्या वक्तव्याची पर्यटनमंत्री शंभुराज देसाईंनी उडवली खिल्ली

SCROLL FOR NEXT