IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Sunrisers  esakal
IPL

RCB vs SRH : हैदराबाद समोर बेंगलोरची सपशेल शरणागती; पाहा Highlights

सकाळ डिजिटल टीम

 विल्यमसनचा षटकार मारत थाटात विजय साजरा; पाहा हायलाईट्स 

विल्यमसनने आठव्या षटकाच्या शेवट्च्या चेंडूवर षटकार मारत सामना जिंकून दिला.

64-1 : विजयाच्या उंबरठ्यावर अभिषेक बाद 

सलामीवीर अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी पॉवर प्लेमध्येच 56 धावा ठोकल्या. त्यात अभिषेक शर्माच्या आक्रमक 47 धावांचा मोठा वाटा होता. मात्र सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असताना अभिषेक मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला.

68-10 : भुवनेश्वरने आरसीबीची केली अखेर

भुवनेश्रर कुमारने मोहम्मद सिराजला बाद करत आरसीबीचा डाव 68 धावात संपवला.

65-9 : नटराजनची तिसऱ्या षटकात तिसरी शिकार

मार्को जेनसेनच्या माऱ्यानंतर नटराजनने आरसीबीचे कंबरडे मोडले. त्याने वानिंदू हसरंगाला 8 धावांवर बाद करत आरसीबीला 9 वा धक्का दिला.

55-8 : नटराजनने हर्षल पटेलचा उडवला त्रिफळा

टी नटराजनने आपला दुसरा बळी मिळवला. त्याने हर्षल पटेलला 4 धावांवर बाद करत आरसीबीला आठवा धक्का दिला.

49-7 : शाहबाज अहमद शेवटची आशा देखील पॅव्हेलियनमध्ये

उम्रान मलिकने आपल्या वेगाने शाहबाज अहमदला 7 धावांवर बाद केले.

47-6 सुचितचा डबल धमाका 

जगदीशा सुचितने आठव्या षटकात डबल धमाका केला. त्याने षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर 15 धावा करणाऱ्या सुयश प्रभुदेसाईला बाद केले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर धोकादायक दिनेश कार्तिकला शुन्यावर बाद करत आरसीबीला मोठा धक्का दिला.

20-4 : ग्लेन मॅक्सवेल बाद 

टी नटराजनने आधीच अडचणीत सापडलेल्या आरसीबीला अजून अडचणीत आणले. त्याने मॅक्सवेलला 12 धावांवर बाद केले.

8-3 : जेनसेनचा धडाका  

जेनसेनने एकाच षटकात तीन शिकार केल्या. विराट पाठोपाठ अनुज रावत देखील भोपळाही न फोडता माघारी गेला.

5-2 : विराट पुन्हा गोल्डन डकवर बाद 

मार्को जेनसेनने ड्युप्लेसिसला बाद केल्यानंतर पुढच्याच चेंडूवर विराट कोहलीला देखील शुनव्यावर बाद केले. विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे.

5-1 : जेनसेनने उडवला ड्युप्लेसिसचा त्रिफळा

हैदराबादने नाणेफेक जिंकली. 

हैदराबादने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दोन्ही संघांनी आपल्या विनिंग कॉम्बिनेशनमध्ये कोणताही बदल केलेला नाही.

हैदराबादने आरसीबीचा केला मोठा पराभव

मुंबई : सनराईजर्स हैदराबादने आपला विनिंग फॉर्म बलाढ्य रॉयल चॅलेंजर बेंगलोर समोर देखील कायम राखला. त्यांनी प्रथम गोलंदाजी करताना आरसीबीला 68 धावात गुंडाळले. त्यानंतर हे आव्हान एका फलंदाजाच्या मोबदल्यात 8 व्या षटकात पार केले. हैदराबादकडून सलामीवीर अभिषेक शर्माने दमदार 47 धावा ठोकल्या. तर कर्णधार केन विल्यमसनने सावध फलंदाजी करत 17 चेंडूत 16 धावा केल्या.

रॉयल चॅलेंजर बेंगलोरने ठेवलेले 69 धावांचे माफक आव्हान सनराईजर्स हैदराबादच्या सलामीवीरांनीच पार करण्याचा प्रयत्न केला. सलामीवीर अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसन यांनी पॉवर प्लेमध्येच 56 धावा ठोकल्या. त्यात अभिषेक शर्माच्या आक्रमक 47 धावांचा मोठा वाटा होता. मात्र सामना जिंकण्यासाठी 5 धावांची गरज असताना अभिषेक मोठा फटका मारण्याच्या नादात बाद झाला. त्यानंतर विल्यमसनने आठव्या षटकाच्या शेवट्च्या चेंडूवर षटकार मारत सामना जिंकून दिला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे पुन्हा केले कौतुक, पुढील वर्षी भारत दौऱ्यावर येण्याचे दिले संकेत

"एवढा खर्च तुम्हाला दाखवण्यासाठी केला, की..."; इंदुरीकर महाराजांचं अजब उत्तर, लेकीच्या राजशाही साखरपुड्यावरून झाली होती टीका

Mahavikas Aghadi Decision: सातारा जिल्ह्यातील सर्व पालिका एकत्र लढविणार; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय; नेमकं बैठकीत काय घडलं?

CAT 2025 Exam: CAT 2025 परीक्षा 30 नोव्हेंबरला; निकाल जानेवारी 2026 मध्ये जाहीर होणार

मोठी बातमी! दुबार-तिबार मतदारांना नगरपरिषदेनंतर झेडपी, महापालिकेच्या मतदार यादीत नाव असल्यास तेथेसुद्धा करता येणार मतदान; काय आहे नेमका नियम? वाचा...

SCROLL FOR NEXT