IPL 2022 SRH vs GT Today Match  sakal
IPL

IPL 2022 : गुजरातचा विजयरथ हैदराबाद रोखणार?

हार्दिक-विल्यमसन आज नवी मुंबईत एकमेकांसमोर उभे ठाकणार

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : गुजरात टायटन्सचा संघ पहिल्यांदाच आयपीएलमध्ये सहभागी होत आहे. मात्र हार्दिक पंड्याच्या नेतृत्वात मैदानात उतरणाऱ्या या संघाने पहिल्या तीन लढतींत प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवत आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आता नवी मुंबईतील डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये रंगणाऱ्या लढतीत गुजरात टायटन्ससमोर सनरायझर्स हैदराबादचे आव्हान असणार आहे.(IPL 2022 SRH vs GT Today Match)

केन विल्यमसनच्या या संघाने पहिल्या दोन लढतींतील पराभवानंतर रविवारी चेन्नई सुपरकिंग्जला हरवत गुणांचे खाते उघडले. हा संघ गुजरात टायटन्सचा विजयरथ रोखतो की पंड्याचा संघ विजयाचा चौकार मारतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.

सलामी फलंदाज शुभमन गिल याने पंजाब किंग्जविरुद्धच्या लढतीत चमकदार खेळी साकारली. मॅथ्यू वेडचे संघातील स्थान कायम असेल. साई सुदर्शन, हार्दिक यांच्या खांद्यावर मधल्या फळीची जबाबदारी असेल. राहुल तेवतिया याने या मोसमात तीनपैकी २ लढतींमध्ये सामन्याला कलाटणी देणाऱ्या खेळी साकारल्या आहेत. त्यामुळे त्याला कमी लेखता येणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jayant Patil : वडिलांच्या निधनानंतर भारतात आले अन् राजकारणात सक्रिय झाले, जयंत पाटील राष्ट्रवादीत कसे आले?

Charging Phone Via Laptop: फोन लॅपटॉपने चार्ज करताय? मग जाणून घ्या होणारे 4 मोठे तोटे

'सैफ रुग्णालयात असताना करीनाच्या गाडीवरही हल्ला' प्रसिद्ध अभिनेत्याचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'बेबो प्रचंड घाबरली आणि तिने...'

Latest Marathi News Updates : 'जयंत पाटील घाबरणारे नाही, सत्तेसाठी विचार सोडणार नाही' - रोहित पवार

Nashik Zilla Parishad : नाशिक जिल्हा परिषदेत दिव्यांग व्यक्तीला मारहाण; मानवी हक्क आयोगाने सखोल तपासाची मागणी केली

SCROLL FOR NEXT