Mumbai Indians
Mumbai Indians IPL
IPL

आठ कोटींचा गडी बाकावर; MI कसं जिंकणार? जाफरचा टोला

सकाळ डिजिटल टीम

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2022 च्या यंदाच्या हंगामात पाचवेळच्या चॅम्पियन मुंबई इंडियन्सवर सलग पाच पराभव स्वीकारण्याची नामुष्की ओढावलीये. ज्याच्या नेतृत्वाखाली संघाने सर्वाधिक ट्रॉफ्या जिंकल्या त्याच्या नेतृत्वावर आणि संघ व्यवस्थापनेच्या रणनितीवर आता प्रश्नचिन्ह उपस्थितीत करण्यात येत आहे. वासीम जाफरने टीमच्या प्लेइंग इलेव्हनवर नाराजी व्यक्त केलीये. जर तुम्ही एखाद्या खेळाडूसाठी मेगा लिलावात 8.25 कोटी मोजता आणि प्लेइंग इलेव्हमध्ये त्याला स्थान देत नाही हे हास्यास्पद वाटते, अशा आशयाचे मत जाफरनं व्यक्त केले आहे. वासीम जाफरने कोट्यवधीच्या आकड्यातून टिम डेविडला बाकावर बसवण्याच्या निर्णयावर प्रश्न उपस्थितीत केलाय.

आयपीएलच्या मेगा लिलावात मुंबई इंडियन्सने 40 लाख मूळ किंमत असलेल्या टिम डेविडवर 8.25 कोटींचा डाव खेळला होता. त्याला संघात घेण्यासाठी मोठी चुरसही पाहायला मिळाले. अखेर मुंबईने बाजी मारत त्याला आपल्या ताफ्यात सामील करुन घेतलं. पण त्याने पाच पैकी केवळ दोनच सामने खेळले आहेत. टिम डेविडला दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्स विरुद्ध त्याला संधी देण्यात आली. पहिल्या सामन्यात 12 आणि दुसऱ्या सामन्यात त्याला अवघी एक धाव करता आली. त्यामुळे पुढच्या सामन्यात त्याला बाकावर बसवण्यात आले. पंजाब विरुद्धच्या लढतीत मुंबई इंडियन्स केवळ तीन परदेशी खेळाडूंसह मैदानात उतरला होता.

टिम डेविड हा सिंगापूरचा खेळाडू आहे. मागील काही कालावधीपासून तो आपल्या स्फोटक फलंदाजीमुळे चर्चेत राहिला आहे. पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्याने कमालीची फटकेबाजी केली होती. या स्पर्धेत त्याने जवळपास 160 स्ट्राइक रेटनं धावा कुटल्या होत्या. त्यामुळेच त्याला आणखी संधी मिळायला हवी होती, असे जाफरला वाटते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT