Mumbai Indians vs Lucknow Super Giants sakal
IPL

मुंबईला सहावा पराभव टाळण्याचे आव्हान; आज लखनौशी लढत

कोणत्या ११ खेळाडूंना संघात स्थान द्यायचे, हा यक्षप्रश्‍न त्यांच्यासमोर उभा

सकाळ वृत्तसेवा

IPL 2022 : सर्वाधिक पाच वेळा जेतेपद पटकावणारा मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या आयपीएल मोसमात सपशेल अपयशी ठरतोय. सलग पाच लढतींमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागलाय. पहिल्या पाचही लढतींत विविध पर्यायांची चाचपणी करून बघितल्यानंतरही संघाला काही यश मिळेना. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई इंडियन्सचा संघ आज लखनौ सुपर जायंटस्‌ संघाशी दोन हात करील तेव्हा या संघासमोर अचूक संघ निवडीचा पेच असणार आहे. कोणत्या ११ खेळाडूंना संघात स्थान द्यायचे, हा यक्षप्रश्‍न त्यांच्यासमोर उभा ठाकणार आहे.

कर्णधार रोहित शर्माला फलंदाजीत अपयश येत आहे. सुरुवातीच्या लढतींमध्ये आक्रमक फलंदाजी करीत धावा करणाऱ्या इशान किशनकडूनही मागील काही लढतींत निराशा होत आहे. कायरॉन पोलार्डलाही प्रतिस्पर्ध्यांवर वर्चस्व गाजवता आलेले नाही. तिलक वर्मा व सूर्यकुमार यादव हे दोन फलंदाज छान कामगिरी करीत आहेत, पण या दोघांमुळे संघाला काही विजय मिळवता आलेला नाही. डीवाल्ड ब्रेव्हीस या युवा खेळाडूंकडून अपेक्षा आहेत. पण तो एकाहाती सामना फिरवून देऊ शकेल, अशी इच्छा बाळगणे चुकीचे ठरील. त्याच्याकडे अनुभवाची कमतरता आहे. टीम डेव्हीड याला पुन्हा संघात स्थान दिले जाऊ शकते.

खेळाडूंचा फॉर्म कायम

लखनौ सुपर जायंटस्‌ या संघातील बहुतांशी खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. कर्णधार के. एल. राहुल, दीपक हुडा, आयुष बदोनी, कृणाल पंड्या, अवेश खान, रवी बिश्‍नोई हे भारतीय खेळाडू जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. या संघाने ५ सामन्यांमधून तीनमध्ये विजय मिळवत ६ गुणांची कमाई केली आहे. उद्या हा संघ चौथ्या विजयासाठी प्रयत्न करताना दिसेल.

संघातील परदेशी खेळाडूंबाबत संभ्रम

लखनौ सुपर जायंटस्‌ संघासाठी परदेशी खेळाडूंची निवड करण्याबाबत संभ्रम असणार आहे. या संघात क्वींटोन डी कॉक, जेसन होल्डर, मार्कस स्टोयनीस व दुशमंता चमीरा या चार परदेशी खेळाडूंना प्राधान्य दिले जाते. पण संघाचा मेंटॉर गौतम गंभीर उद्याच्या लढतीत कोणत्या परदेशी खेळाडूंना खेळवायचे याबाबत कोणता निर्णय घेतो हे पाहणे रंजक ठरणार आहे. जेसन होल्डर व मार्कस स्टोयनीस यांच्यापैकी एकाला वगळून इविन लुईस याला संघात स्थान देण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याच्या समावेशामुळे फलंदाजी भक्कम होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोन्याच्या भावात मोठी वाढ! चांदीही 3 लाखांवर; गुंतवणूकदार खुश, मात्र सर्वसामान्यांची चिंता वाढली; पाहा आजचा भाव

Kabanur Protest in Kolhapur : महापुरुषांच्या अवमानकारक वक्तव्यामुळे कबनूरमध्ये तणाव; संतप्त जमावाची इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलिस ठाण्याकडे धाव, नेमकं काय घडलं?

Latest Marathi News Live Update : दिल्लीतील महाराष्ट्र सदनाला धमकीचा मेल

Video : अरे, ही काय डोक्यावर पडलीय का? Hardik Pandya बाद होताच, गर्लफ्रेंड माहिका शर्माने काय केलं पाहा; नेटिझन्स संतापले

Stock Market Today: ट्रम्प टॅरिफला धक्का देत शेअर बाजार उसळला! सेन्सेक्स 400 अंकांनी वाढला; मात्र IDFC घसरला; कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT