IPL 2022 Today Match 
IPL

IPL 2022: दिल्ली-पंजाब लढत ब्रेबॉर्नवर, पण सामन्याअगोदर कोरोना चाचणी होणार

दिल्लीच्या सर्व खेळाडूंची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी नंतरच सामन्याचे भवितव्य निश्चित

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढलेल्या दिल्ली संघाचा पंजाब किंग्जविरुद्ध आज पुण्यात होणारा सामना आता मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर नियोजित करण्यात आला आहे; मात्र सामन्यावरचे अनिश्चिततेचे सावट कायम आहे. या लढतीअगोदर सकाळी दिल्लीच्या सर्व खेळाडूंची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी होणार आहे. नंतरच सामन्याचे भवितव्य निश्चित होईल.

आरोग्याच्या सुरक्षिततेची चोख व्यवस्था असतानाही दिल्ली संघात कोरोनाने शिकराव केला. मिशेल मार्श या खेळाडूसह सपोर्ट स्टाफमधील चौघे जण बाधित झाले आणि आयपीएल प्रशासनासमोर अडचणी उभ्या राहिल्या आहेत. हा सामना पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुण्यात होणार आहे, पण सध्यस्थितीत प्रवास धोक्याचा ठरू शकतो या कारणामुळे ही लढत मुंबईत ब्रेबॉर्न स्टेडियमवर खेळण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे.(IPL 2022 Today Match)

दिल्लीचा संपूर्ण संघ विलगीकरणात आहे, त्यांची दररोज चाचणी करण्यात येत आहे. मिशेल मार्शचा अपवाद वगळता इतर कोणताही खेळाडू बाधित झालेला नाही. प्रत्येकाची चाचणी निगेटिव्ह येत आहे, परंतु उद्या सामन्याच्या दिवशी सकाळी सर्वांची पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करण्यात येईल, ती निगेटिव्ह आल्यावर सामना पार पडेल, असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.

फिजिओ पॅट्रिक फरहाद कोरोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाल्यावर १६ तारखेपासून दिल्ली संघातील सर्वांची दररोज चाचणी करण्यात येत आहे.

पंजाबचा संघही मुंबईत

बुधवारी होणाऱ्या या सामन्यासाठी पंजाबचा संघ मंगळवारी पुण्यात दाखल होणार होता, परंतु आता त्यांनाही मुंबईतच राहण्यास सांगण्यात आले आहे. आमचे वास्तव्य मुंबईतच असून आम्ही येथेच सराव करत आहोत, असे पंजाब संघाकडून सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

चिंता वाढवणारी बातमी! भारताचा स्टार फलंदाज तातडीने संघाची साथ सोडून घरी परतला; आज सरावालाही नाही आला, कारण...

‘सुपर डुपर’चे उत्सुकता वाढवणारे पोस्टर प्रदर्शित; 'या' तारखेला होणार सिनेमा रिलीज

T20 World Cup Tickets: उपांत्य फेरी, अंतिम फेरीच्या तिकिटांच्या विक्रीला सुरुवात; मुंबईत होणाऱ्या सामन्याचे तिकीट कुठे खरेदी कराल?

आई -मुलीच्या नात्याचा हळवा प्रवास उलगडणारा ‘तिघी’चा ट्रेलर प्रदर्शित

Latest Marathi News Live Update : बहिणीचं शीर धडावेगळं केलं, सख्ख्या भावाकडून निर्घृण हत्या

SCROLL FOR NEXT