ipl 2023-ashish-nehra-did-not-celebrate-shubman-gill-century-feud-with-captain-hardik-pandya-gujarat-titans cricket news marathi kgm00 
IPL

IPL 2023: शुभमनचं शतक तरीही कोच नेहरा नाराज... कर्णधार हार्दिकशी केले भांडण

नेहरा डग आऊटमध्ये चिडलेला आणि रागावलेला दिसला डाव संपल्यानंतर...

Kiran Mahanavar

आयपीएल 2023 च्या 62 व्या सामन्यात गतविजेत्या गुजरात टायटन्सने सोमवारी सनरायझर्स हैदराबादचा 34 धावांनी पराभव केला. या विजयासह गुजरातचा संघही प्लेऑफसाठी पात्र ठरणारा पहिला संघ ठरला आहे.

मात्र, प्रशिक्षक आशिष नेहरा सामना अनेकदा रागात दिसला, पण 2022 मध्ये त्याने आयपीएलच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारल्यापासून तो पहिल्यांदाच रागावलेला दिसत आहे.

वास्तविक, ही घटना गुजरातच्या डावादरम्यान घडली. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करणाऱ्या गुजरात संघाला पहिल्याच षटकातच साहा खाते न उघडता पॅव्हेलियनमध्ये परतल्याने मोठा धक्का बसला. यानंतर शुभमन गिल आणि साई सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 147 धावांची भागीदारी केली. साई सुदर्शन तो 36 चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 47 धावा करून बाद झाला.

सुदर्शन आऊट होताच विकेट्सची झुंबड उडाली. त्यानंतर हार्दिक पंड्या (8), डेव्हिड मिलर (7), राहुल तेवतिया (3) हेही स्वस्तात बाद झाले. धावसंख्या एक बाद 147 वरून पाच बाद 175 अशी झाली. यानंतर शुभमनने उत्कृष्ट शतक झळकावले. त्याचे आयपीएल कारकिर्दीतील हे पहिले शतक होते. याचं कौतुक करत गुजरातच्या बाकीच्या खेळाडूंनी त्याच्यासाठी उभे राहून टाळ्या वाजवल्या, पण आशिष नेहराने तिथेच बसून आनंद व्यक्त केला नाही.

आशिष नेहराच्या प्रतिक्रियेने समालोचक आकाश चोप्रा आणि सबा करीम देखील संतापले. शतक झळकावल्यानंतर शुभमननेही विकेट गमावली. तो 58 चेंडूंत 13 चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 101 धावा करून बाद झाला. गुजरातने 41 धावा करताना आठ विकेट गमावल्या. यात भुवनेश्वरने शेवटच्या षटकात चार विकेट घेतल्या.

नेहरा आणि हार्दिक यांच्यातील वादाची घटना त्याच वेळी घडली जेव्हा गुजरातच्या फलंदाजाने खराब शॉट खेळून आपली विकेट गमावली. त्यानंतर नेहरा डग आऊटमध्ये चिडलेला आणि रागावलेला दिसला. डाव संपल्यानंतर नेहराची कर्णधार हार्दिकशी टक्कर झाली आणि सीमारेषेवर दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. नेहरा गेल्यानंतर गुजरात टायटन्सचे संचालक विक्रम सोलंकी हार्दिकला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले.

मात्र, सर्व वादानंतरही गुजरातच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करत हैदराबादला 20 षटकांत 9 बाद 154 धावांवर रोखले. मोहित शर्मा आणि मोहम्मद शमी या दोघांनी प्रत्येकी चार विकेट घेतल्या. त्याचवेळी यश दयालला एक विकेट मिळाली. या विजयासह गुजरातचे 13 सामन्यांत नऊ विजय आणि चार पराभवांसह 18 गुण झाले आहेत. संघ अजूनही अव्वल स्थानावर आहे. त्याचा पुढचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. गुजरातचे पहिले किंवा दुसरे स्थान निश्चित मानले जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

IND vs ENG 2nd Test: 5/84 ते 5/385! हॅरी ब्रूक, जेमी स्मिथ यांच्या १५० धावा; १४८ वर्षांच्या इतिहासात जे कधीच घडले नव्हते ते इंग्लंडने केले

Kondhwa Crime : कोंढवा लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या ताब्यात; आरोपी कुरिअर बॉय नसून, आयटी अभियंता

Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला चीनची सक्रिय मदत; लष्कर उपप्रमुखांची माहिती

SCROLL FOR NEXT